Saturday, June 29, 2024

‘साक्षात प्रभू आल्याचा भास’, अरुण गोविल यांना भेटून भावुक झाले स्वामी जगद्गुरु रामभद्राचार्य

‘रामायण’ किंवा ‘राम’ हे शब्द उच्चारले किंवा कानावर पडले तरी डोळ्यासमोर अजूनही फक्त आणि फक्त अरुण गोविल हेच उभे राहतात. त्यांनी बी. आर. चोप्रा यांच्या रामायणामध्ये ‘राम’ ही भूमिका फक्त साकारली नाही तर अजरामर केली. या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अशी काही छाप सोडली जी आजही कायम आहे. आजही अनेक लोकं त्यांना भेटल्यावर आधी त्यांना वाकून नमस्कार करतात. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपण व्हायरल होताना पाहिले आहे. आजही अनेकांना त्यांच्यामध्ये प्रभू रामच आहे असे वाटते. याला कोणीही अपवाद नाही. 

सध्या सोशल मीडियावर अरुण गोविल यांचा असच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अरुणजी स्वामी जगद्गुरु रामभद्राचार्य यांच्या सत्संगाला उपस्थित असल्याचे दिसते. सत्संग झाल्यावर अरुण गोविल यांनी स्वामी जगद्गुरु रामभद्राचार्य यांचे दर्शन घेताना नमस्कार केला, तेवढ्यात स्वामी रामभद्राचार्य यांनी त्यांना मिठी मारली आणि ते भावुक झाले, त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. कदाचित त्यांना देखील अरुणजी यांच्यामध्ये प्रभू राम असल्याचा भास झाला असावा. स्वामी रामभद्राचार्य यांनी अरुण गोविल यांना सांगितले की, ‘तुम्ही जेव्हा अभिनय करायचा तेव्हा माझे डोळे बंद असले तरी मला प्रभा राम यांचा भास आपल्यात व्हायचा. तुम्हाला देखील वाटले असेल की, जोपर्यंत भारतात रामत्व नसेल तोपर्यंत या देशाचे कल्याण होणार नाही.”

दरम्यान स्वामी जगद्गुरु रामभद्राचार्य हे जन्मतः अंध असले तरी त्यांना वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना गीता तोंडपाठ होती. तर वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी संपूर्ण रामचरितमानस पाठ केले होते. कोरोनाच्या काळात जेव्हा पुन्हा टीव्हीवर रामायण दाखवण्यात आले, त्यानंतर पुन्हा एकदा अरुण गोविल यांची लोकप्रियता वाढली आणि राम म्हणून पुन्हा त्यांचा नावलौकिक झाला.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मसकली गाण्याच्या रिमेकवर ए.आर रेहमान यांची नाराजी? म्हणाले, ‘मुळ गाणे बनवायला 365 दिवस…’

ए पळा पळा..! गायिकेने असा काही सुर छेडला की, माणसांसह कुत्र्या-मांजरांची झाली पळापळ, पाहा रेहमानने शेअर केलेला भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा