१८ वर्षीय आर्या वालवेकर हिला भविष्यात अभिनेत्री व्हायचं आहे, टेलिव्हिजनसह मोठ्या पडद्यावर झळकण्याचं तिचं स्वप्न आहे.
न्यू जर्सी येथे पार पडलेल्या व्हर्जिनियाच्या भारतीय अमेरिकन आर्य वालवेकर(Aarya Walvekar) हिने यावर्षी ‘मिस इंडिया यूएसए २०२२’ हा पूरस्कार पटकावला आहे. न्यूजर्सी येथे झालेल्या वार्षिक स्पर्धेत आर्यला ‘मिस इंडिया यूएसए २०२२’ चा ताज देण्यात आला. विजेती आर्या वालवेकर हिला भविष्यात अभिनेत्री व्हायचं आहे, टेलिव्हिजनसह मोठ्या पडद्यावर झळकण्याचं तिचं स्वप्न असल्याचं आर्यानं व्यक्त केलं आहे. तसेच आर्याला नवनवीन जागी प्रवास करणे, नवीन लोकांना भेटने, विविध विषयांवर चर्चा करणे, स्वपंपाक करणे या तिच्या आवडीच्या गोष्टी आहे असं देखील आर्याने सांगितलं. आर्या सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून पुढे तिला तिचं करियर, अॅक्टींग, फॅशन, लाईफस्टाइल या क्षेत्रात करायचं असल्याचं आर्याने स्पष्ट केलं आहे तसेच मिळालेल्या या पूरस्काराबाबत तिने आनंद व्यक्त केला आहे. ‘ युनिव्हर्सिटी ऑफ वर्जीनिया’ ची विद्यार्थी सौम्या शर्मा (Soumya Sharma) यांनी दुसरे स्थान मिळविले आणि न्यू जर्सीची संजना चेकुरीने (Sanjana Chekuri) तिसरे स्थान मिळविले आहे.
यंदा स्पर्धेचा ४० वा वर्धापन दिवस होता आणि ती भारताबाहेर आयोजित करण्यात येणारी ही सर्वात जास्त काळ चालणारी स्पर्धा आहे.या स्पर्धेची सुरुवात न्यूयॉर्क मधील भारतीय-अमेरिकन धर्मात्मा आणि नीलम सरन यांनी वर्ल्डवाईड पेजंट्सच्या बॅनरखाली केली होती. तर गेल्या वर्षी म्हणजे मिस इंडिया यूएसए २०२१ चा किताब वैदेही डोंगरेने (Vaidehi dongre)पटकावला होता. वर्ल्डवाइड पीजेंट्स संस्थापक आणि अध्यक्ष धर्मात्मा सरन म्हणाले की, “या वर्षांत जगभरातील भारतीय समुदायाच्या सहकार्याबद्दल मी कृतज्ञ आहे.”
अक्षी जैन ‘मिसेज इंडिया यूएसए’ बनले
वॉशिंग्टनची अक्षी जैन यांना ‘मिसेस इंडिया यूएसए’ हा पूरस्कार देण्यात आला आणि न्यूयॉर्कची तनवी ग्रोवरली ‘मिस टीन इंडिया यूएसए’ म्हणून निवडले गेले. मिस इंडिया यूएसए, मिसेस इंडिया यूएसए आणि मिस टीन इंडिया यूएसए या तीन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ३० राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तब्बल ७४ स्पर्धकांनी भाग घेतला. तिन्ही श्रेणीतील विजेत्यांना त्याच गटाद्वारे आयोजित जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी पुढील वर्षाच्या सुरुवातीला मुंबईला जाण्यासाठी मोफत तिकिटे मिळतील. तसेच या कार्यक्रमाला भारतीय गायिका शिबानी कश्यप, खुशी पटेल, मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२२ आणि स्वाती विमल, मिसेस इंडिया वर्ल्डवाइड यांनी प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
शाहरुख खानच्या ‘त्या’ वागण्याने भडकले नेटकरी; पण आर्यन खानचं का होतंय कौतुक? एकदा वाचाच
‘पुष्पा’मधील भंवर सिंगने ‘अशी’ केली होती करिअरला सुरुवात, इरफान खानच्या चित्रपटाने मिळालेली प्रेरणा