Wednesday, October 9, 2024
Home कॅलेंडर ‘पुष्पा’मधील भंवर सिंगने ‘अशी’ केली होती करिअरला सुरुवात, इरफान खानच्या चित्रपटाने मिळालेली प्रेरणा

‘पुष्पा’मधील भंवर सिंगने ‘अशी’ केली होती करिअरला सुरुवात, इरफान खानच्या चित्रपटाने मिळालेली प्रेरणा

अल्लू अर्जुनच्या (allu arjun)  ‘पुष्पा: द राइज’मधला आयपीएस अधिकारी भंवर सिंग शेखावत आठवतोय का? चित्रपटात त्याच्या एन्ट्रीनंतर कथेला नवे वळण घेताना दिसत आहे. साऊथचा सुपरस्टार फहद फासिलने (fahadh faasil) साकारलेल्या या व्यक्तिरेखेचे ​​ते सौंदर्य आहे. फहद फासिलने साऊथ इंडस्ट्रीत निर्माता ते अभिनेत्यापर्यंत काम केले आहे. तो मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. याशिवाय ते तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही सक्रिय असून आता हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल…

फहाद फासिलचा जन्म 8 ऑगस्ट 1982 रोजी केरळमधील अलाप्पुझा येथे झाला. फहाद फासिलचे वडील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक-निर्माता आणि पटकथा लेखक आहेत. यानंतरही त्यांच्यासाठी फिल्मी दुनियेत करिअर करणं तितकसं सोपं नव्हतं. फहाद फासिलला त्याच्या वडिलांनी लाँच केले होते, पण सुरुवातीला त्याचे चित्रपट फ्लॉप ठरले होते. फहादने 2002 मध्ये त्याच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कायथुम दुरथ’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट खराब फ्लॉप ठरला त्यामुळे तो खूप निराश झाला आणि त्याने अभिनय सोडला.

पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर फहादने अभिनय सोडून शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि तो अमेरिकेला गेला. मात्र, दरम्यानच्या काळात त्याच्यात पुन्हा अभिनय करण्याची उर्मी निर्माण झाली. याचे श्रेय दिवंगत अभिनेते इरफान खानला जाते. अभिनय सोडल्यानंतर फहादने शिक्षण घेत असताना ‘युं होता तो क्या होता’ हा चित्रपट पाहिला. यातून त्याला खूप प्रेरणा मिळाली. या चित्रपटातील अभिनेता इरफान खानची भूमिका फहादला आवडली. यानंतर त्यांनी इरफानचे अनेक चित्रपट पाहिले आणि पुन्हा अभिनयाच्या दुनियेत पुनरागमन केले. फहद फासीलने इंडस्ट्रीत पुन:प्रवेश केल्यानंतर आपला उत्कृष्ट अभिनय सिद्ध केला. जरी फहाद बहुतेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकेत किंवा कॅमिओमध्ये दिसला, परंतु तो त्याचे पात्र अशाप्रकारे साकारतो की ते पडद्यावर जिवंत होते.

फहद फासिलने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत जवळपास 50 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2018मध्ये, त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या श्रेणीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या ‘सी यू सून’ आणि ‘जोजी’ आणि ‘मालिक’ या चित्रपटांमुळे त्यांना हिंदी भाषिक लोकांमध्येही चांगली ओळख मिळाली. फहद फासिलने गेल्या वर्षीच्या ‘पुष्पा’ आणि या वर्षी प्रदर्शित झालेल्या कमल हासनच्या ‘विक्रम’ चित्रपटात चमकदार कामगिरी केली आहे. जर आपण वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललो, तर त्याने 2018मध्ये नाझरिया नाझीमशी लग्न केले.

अधिक वाचा- 
‘बाईपण भारी देवा’नंतर संगीतकार साई-पियुष करणार ‘ही’ कामे; एकदा वाचाच
Dada Kondke | मनोरंजनाचा वादा म्हणजेच ‘दादा’

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा