Wednesday, December 4, 2024
Home बॉलीवूड ड्रग्ज प्रकरणानंतर आयपीएल लिलावात दिसला शाहरूख पुत्र ‘आर्यन खान’, चाहते बोलले ‘शेर का बच्चा’

ड्रग्ज प्रकरणानंतर आयपीएल लिलावात दिसला शाहरूख पुत्र ‘आर्यन खान’, चाहते बोलले ‘शेर का बच्चा’

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसाठी २०२१ हे वर्ष खूप कठीण गेले आहे. गेल्यावर्षी त्याचा मुलगा आर्यन खानला अं’मली पदार्थ प्रकरणी तुरुंगवास भोगावा लागला होता. मुलावर मोठे आरोप असतानाही शाहरुखने सगळ्या गोष्टींचा सामना केला आणि नंतर तब्बल महिनाभरानंतर मुलाला जामीन मिळवून दिला. त्याचवेळी शाहरुखने काही काळापूर्वी त्याच्या व्यावसायिक आघाडीवर पुनरागमन केले आहे.

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२२) चा लिलाव सुरू झाला आहे. आता शाहरुख (Shahrukh Khan) हा आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) मालक असल्याने लिलावात त्याची उपस्थितीही महत्त्वाची आहे. पण कामामुळे त्याची दोन्ही मुलं आर्यन खान (Aryan Khan) आणि सुहाना खान शाहरुखची ही जबाबदारी पार पाडताना दिसले. आर्यन आणि सुहाना ऑक्शन ब्रीफिंगमध्ये स्पॉट झाले होते. हा फोटो येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्यनच्या पहिल्या पब्लिक अपिअरन्सने चाहते आहेत खूप खुश 

आर्यनला पब्लिक इव्हेंटमध्ये पाहून चाहत्यांना खूप आनंद होत आहे. अं’मली प्रकरणात तुरुंगातून सुटल्यानंतर आर्यनचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम आहे. युजर्सनी आर्यनच्या या धाडसाचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले की, “इतक्या दिवसांनी पाहून आनंद झाला… आर्यन कठीण परिस्थितीतून बाहेर आला आणि त्याचे कुटुंबही… आता तो पुन्हा पडद्यावर आला आहे… त्याच्या मोहक लूकसाठी सज्ज आहे.” दुसऱ्याने लिहिले की, “मी खूप खुश आहे.”

आर्यनला पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. दुसर्‍या युजरने लिहिले की, “तो परत आला आहे, राजकुमार आर्यन @iamsrk मी नेहमी तुझ्यासोबत आहे.” दुसर्‍याने लिहिले की, “तुला पाहून आनंद झाला, तुझ्या चेहऱ्यावर नेहमी हसू हवं आणि तुला मास्कशिवाय बघायचं आहे…त्यामुळे माझा दिवस आनंदात जातो.” एकाने लिहिले की, “सिंहाचा मुलगा आला आहे.” इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सर्वत्र चाहते आर्यन खानवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्याला सार्वजनिक व्यासपीठावर पाहून चाहत्यांना खूप आनंद होत आहे.

हेही वाचा –

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा