Tuesday, July 9, 2024

जामीन मंजूर होऊनही आज तुरुंगातच राहू शकतो आर्यन खान? काय आहे नेमकं कारण?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, मॉडेल मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना अं’मली पदार्थ प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आर्यन सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना एनसीबीच्या पथकाने २ ऑक्टोबरला क्रूझमधून ताब्यात घेतले होते.

मात्र, गुरुवारी (२८ ऑक्टोबर) जामीन मिळाल्यानंतरही आर्यनला सोडण्यात आले नाही. याचे कारण म्हणजे, न्यायालयाकडून अद्याप जामीन आदेशाची प्रत मिळालेली नाही. आदेशाची प्रत आल्यानंतर शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) संध्याकाळी आर्यन तुरुंगातून बाहेर येऊ शकतो. शुक्रवारी, न्यायालय आपला तपशीलवार आदेश देईल, त्यानंतर आर्यन खानची सुटका केली जाईल. आर्यनला तुरुंगाच्या बॅरेकमधून बाहेर काढले जाईल आणि सत्र कारागृह अधीक्षकांच्या कार्यालयात नेले जाईल, जिथे कायदेशीर प्रक्रिया होईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आर्यन मन्नतला परतेल. मात्र जर न्यायालयाकडून आदेशाची प्रत आली नाही, तर आजही आर्यन तुरुंगातच राहील.

अद्याप मिळाली नाही जामीन आदेशाची प्रत
उच्च न्यायालयाकडून आर्यन खानच्या जामीन आदेशाची प्रत मिळाल्यानंतर, त्याच्या वकिलांना राष्ट्रीय नार्कोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) प्रकरणांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयासमोर जामीनासह इतर आवश्यक कागदपत्रांसह हजर करावे लागतील. विशेष न्यायालय त्यानंतर सुटकेची कागदपत्रे जारी करेल, जी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तुरुंग अधीक्षकांसमोर सादर करावी लागतील, त्यानंतरच आर्यनची आज सुटका होऊ शकेल.

जामीन मिळाल्याची बातमी ऐकून शाहरुखला अश्रू अनावर
आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानने त्याची संपूर्ण कायदेशीर टीम आणि मॅनेजर पूजा ददलानीसोबत फोटोसाठी पोझ दिली. मात्र आर्यनला जामीन मिळाल्याची बातमी समजताच, शाहरुखचे डोळे पाणावले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यनला जामीन मंजूर, ‘मन्नत’वर साजरी होणार दिवाळी

-आर्यन खानला अटक झाल्यापासून ते जामीन मिळेपर्यंत काय काय घडलं? एका क्लिकवर घ्या जाणून

-आर्यनला जामीन न मिळाल्यामुळे ऋतिकने पुन्हा दर्शवला होता पाठिंबा; म्हणाला, ‘हे सर्व अत्यंत…’

हे देखील वाचा