शाहरुख खानचा मुलगा आर्यनसोबत त्याचा मित्र अरबाज मर्चंटला देखील अमली पदार्थांचे सेवन आणि देवाण-घेवाण केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. अरबाज हा नामांकित वकील असलम मर्चंट यांचा मुलगा आहे. आपल्या मुलाला अंमली पदार्थांचे सेवन केल्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर असलम मर्चंट यांनी मौन सोडले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलावर लावलेले आरोप हे निराधार आहेत. त्याला या केसमध्ये उगाच अडकवले जात आहे. त्यांनी अरबाज आणि आर्यनला निर्दोष म्हटले आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, असलम मर्चंट यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले की, “एनसीबी मुलांसोबत खूप चांगला व्यवहार करत आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर काही लोक गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझच्या छापेमारीत अटक झाले आहेत. कोर्टाने त्यांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत ठेवले आहे.” (Aryan Khan co-accused in drugs case Arbaaz merchant father aslam said both are innocent no link in drugs chat)
एका वृत्तवाहिनीशी बोलताना असलम मर्चंट यांनी सांगितले की, “सगळे आरोप खोटे आहेत. परंतु या सगळ्याची तपासणी केली जात आहे. या वेळी असं काही सांगणं योग्य नाहीये. मी एक वकील होण्याच्या नात्याने माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सत्याचाच विजय होणार आहे.”
असलम यांना यावेळी विचारले की, अरबाजवर अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप आहे. यावर ते म्हणाले की, “यावेळी जे काही सापडलं ते शिपमध्ये सापडलं आहे. बाहेर कुठे सापडलं नाही. ते तेव्हा तिथे पाहुणे म्हणून गेले होते.” एनसीबीने दावा केला होता की, आर्यन आणि त्याच्या दोन मित्रांच्या चॅटवरून हैराण करणारे अंमली पदार्थांच्या लिंकचा खुलासा झाला आहे.
यावर असलम म्हणाले की, “ते अंमली पदार्थांच्या संदर्भातील चॅट नाहीये. ते तर या पार्टीमध्ये जाण्यास तयार देखील नव्हते. जहाजमध्ये येण्याच्या शेवटच्या क्षणी झालेली ती चर्चा होती. त्याला आमंत्रण दिले होते. त्यांनी केवळ घाईत तिथे जाण्याचा निर्णय घेतला. अरबाजने माझ्यासोबत नाश्ता केला होता. तसेच रात्री देखील तो माझ्यासोबत जेवायला येणार होता.”
या सगळ्यामुळे आर्यन खान तसेच शाहरुख खान जोरदार चर्चेत आले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-उर्वशी रौतेलाच्या हवेत उडणाऱ्या केसांनी चाहत्यांना केले घायाळ; अदा पाहून नेटकरी म्हणाले, ‘उफ्फ!’
-एनसीबी शाहरुख खानला लक्ष्य करतेय? लावलेल्या आरोपांवर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी तोडले मौन