Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

आर्यननंतर आता त्याच्या ड्रायव्हरची चौकशी सुरू, संशय केला जातोय व्यक्त

मुंबई क्रुझ अं’मली पदार्थांचे सेवन केल्याच्या प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीने आर्यनच्या गाडीच्या ड्रायव्हरची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, तो ड्राईव्हरच होता जो आर्यनला क्रूझपर्यंत घेऊन गेला होता. तसेच असा देखील संशय व्यक्त केला जात आहे की, क्रूझ पार्टीत जाण्याआधी आर्यनने गाडीतच अं’मली पदार्थांचे सेवन केले होते. याबाबत आता आर्यनच्या ड्रायव्हरची चौकशी सुरू आहे.

आर्यनसोबत आणखी ८ आरोपींना जेलमध्ये राहावे लागले आहे, तरी देखील एनसीबीचा या प्रकरणाबाबत शोध सुरू आहे. झालेल्या प्रकरणाचा शोध घेतल्यावर आतापर्यंत १८ लोकांना एनसीबीने अटक केली आहे. (Aryan Khan drug case, NCB is questioning the driver of Aryan khan)

कारागृहामध्ये असणाऱ्या आरोपींना कोणत्याही प्रकारची सुविधा पुरवली जात नाहीये. याबाबत अनेक चर्चा चालू आहेत की, त्यांना कोणतीच सुविधा मिळत नाहीत. परंतु लोकांना हे समजत नाही की, शाहरुख खानचा मुलगा असो किंवा इतर कोणी सगळ्यांना सारखीच वागणूक दिली जाणार आहे. कोर्टाच्या आदेशानुसार, सगळ्या कैद्यांना जे जेवण मिळतं, तेच आता या सगळ्या आरोपींना मिळणार आहे.

याआधी किला कोर्टात गुरुवारी (०७ ऑक्टोबर) झालेल्या सुनावणीनंतर आर्यनला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. परंतु आरोपींनी लगेच जामिनाची याचिका दाखल केली. परंतु ही याचिका फेटाळण्यात आली. सगळ्या मुलांना आर्थर रोड जेलमध्ये आणि मुलींना भायखला जेलमध्ये पाठवले आहे.

रविवारी (३ ऑक्टोबर) आर्यनला अटक करण्यात आले आहे. मुंबईच्या किनारपट्टीवर शनिवारी (२ ऑक्टोबर) एका क्रूज शिपमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेकजण सहभागी होते. अशातच येथे रात्री पोलिसांची धाड पडली. पोलिसांना तेथे काही अं’मली पदार्थ सापडले. या सर्वांमध्ये शाहरुख खानच्या मुलाला देखील एनसीबीने ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबत आणखी आठ जणांना देखील अटक करण्यात आले आहे. तसेच आर्यनचे मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-विद्युत गर्लफ्रेंडसोबत करणार हटके लग्न; ‘वेडिंग प्लॅन’बद्दल म्हणाला, ‘आम्ही १०० पाहुण्यांसह स्कायडायव्हिंग…’

-KBC: ‘बिग बींमुळेच झालंय जिनिलियासोबत लग्न…’, रितेश देशमुखने केला मोठा खुलासा

-आर्यन खानच्या प्रकरणावर अभिनेत्री तापसी पन्नूची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया; म्हणाली, ‘स्टार फॅमिली असेल तर…’

हे देखील वाचा