आर्यनच्या अटकेवर प्रसिद्ध निर्मात्यांनी व्यक्त केले दु:ख; म्हणाले, ‘बिचारा मुलगा खूप…’

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला शनिवारी (२ऑक्टोबर) रोजी अं’मली पदार्थांच्या प्रकरणात एनसीबीने अटक केले होते. मुंबईवरून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ रेव्ह पार्टीमध्ये एनसीबीला अनेक अं’मली पदार्थ सापडले होते. तो आता मुंबईमधील आर्थर तुरुंगात आहे. बुधवारी (२० ऑक्टोबर) त्याच्या जामीनाबाबत सुनावणी चालू होती. त्याचा जामीन पुन्हा एकदा कोर्टाने नाकारला आहे. त्यामुळे खान कुटुंबात पुन्हा एकदा नाराजीचे वातावरण पसरले आहे.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार आर्यन खानला समर्थन करत आहे. ऋतिक रोशन, रविना टंडन, पूजा भट्ट आणि मीका सिंगसोबत अनेक कलाकार आर्यन खानला पाठिंबा देत आहेत. अशातच चित्रपट निर्माते प्रकाश झा यांनी अं’मली पदार्थ प्रकरणात आर्यनला अटक केल्याबद्दल त्यांंचे मौन सोडले आहे. त्यांनी आर्यनबाबत दुःख व्यक्त केले आहे.

एका मुलाखतीत प्रकाश झा यांनी सांगितले की, “त्यांना याबाबत जास्त काही माहिती नाही. परंतु आर्यन या गोष्टीत वाईट पद्धतीने फसला आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “जर मला याबाबत काही माहिती नाही, तर मी यावर कशी काय प्रतिक्रिया देऊ? मला फक्त एवढंच माहित आहे की, बिचारा मुलगा, जो शाहरुख खानचा मुलगा आहे, तो खूप अडचणीत अडकला आहे.” (Aryan Khan drug case, prakash jha said know the poor child who is in trouble)

एनसीबीच्या तपासणीनंतर कोर्टाने आर्यनला ७ ऑक्टोबरपासून १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तो अजूनही तुरुंगातच आहे.

मुलाला अटक झाल्यानंतर शाहरुख आणि गौरी खूप अडचणीत आहेत. ते दोघे नीट जेवण करत नाहीत. तसेच रात्र-रात्र त्यांना नीट झोपही लागत नाही. आपल्या मुलाची तुरुंगातील अशी अवस्था बघून ते पूर्णपणे तुटून गेले आहेत. एवढंच काय, तर शाहरुखने बॉलिवूडमधील त्याच्या मित्रांना विनंती केली आहे की, त्यांनी त्याच्या घरी ‘मन्नत’मध्ये येऊ नये. तो केवळ फोनच्या माध्यमातून त्याच्या मित्रांच्या संपर्कात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग! न्यायालयाने फेटाळला आर्यनचा जामीन; शाहरुखचा मुलगा राहणार तुरुंगातच

-अमृता राव आणि आरजे अनमोल पहिल्यांदाच शेअर करणार त्यांची ‘विवाह’पर्यंत पोहचलेली अनोखी प्रेमकहाणी

-क्या अंदाज हैं! रोहनप्रीतच्या गळ्यावर चाकू ठेऊन नेहा कक्करने हटके अंदाजात केले प्री एनिवर्सरी सेलिब्रेशन

Latest Post