Wednesday, July 3, 2024

अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईहून गोव्याला जाताना क्रूझवर रेव्ह पार्टी करताना पकडले. अंमली पदार्थ प्रकरणात त्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारे आता सलमान खान ‘मन्नत’ येथील शाहरुख खानच्या घरी भेट घेण्यासाठी पोहोचला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सलमान पोहोचला शाहरुखच्या घरी
रविवारी (३ ऑक्टोबर) सकाळपासून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणाबाबत चर्चेत आहे. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर सुपरस्टार सलमान खान रात्री ११.३० च्या सुमारास शाहरुखच्या घरी पोहोचला. त्याने शाहरुखला भेटून त्याचे सांत्वन केले आणि काही काळानंतर तिथून निघून गेला. असे सांगितले जात आहे की, सलमान शाहरुख आणि कुटुंबियांशी फक्त आर्यनबद्दल बोलण्यासाठी भेटला आहे.

४ ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी
वास्तविक शाहरुखचा मुलगा आर्यनसह ३ जणांना हायप्रोफाईल रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की, आर्यनवर अंमली पदार्थाचे सेवन केल्याचा आरोप आहे आणि त्याच्याशी संबंधित एक व्हॉट्सॲप चॅट देखील सापडला आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना न्यायालयाने एनसीबी कोठडी एका दिवसासाठी म्हणजेच ४ ऑक्टोबर पर्यंत दिली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी सोमवारी (४ ऑक्टोबर) दुपारी होणार आहे.

सोमवारी एनसीबी सर्वांना न्यायालयात करणार हजर
एनसीबीने सांगितले की, आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. न्यायालयाला त्यांच्या नजरकैदेत वाढ करण्यास सांगितले जाईल. त्याचवेळी, नूपूर सतिजा, इश्माजीत सिंग चड्ढा, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा आणि विक्रांत छोकर या पाच इतर आरोपींनाही रविवारी अटक करण्यात आली. त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना सोमवारी न्यायालयातही हजर केले जाईल.

एनसीबीचे प्रमुख एसएन प्रधान म्हणतात की, “एनसीबी बॉलिवूड कनेक्शनचाही विचार करत आहे. आम्ही अंमली पदार्थ टोळीचा पर्दाफाश करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आम्ही अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ तरुणांना मुंबईतील क्रूझ शिपमधून अंमली पदार्थाचा वापर आणि तस्करीच्या आरोपाखाली अटक केली आहे.”

आर्यनच्या अटकेबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले…
आर्यनच्या अटकेबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी म्हटले आहे की, “जो कोणी चुकीच्या कृत्यात सामील असेल, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे.” ते म्हणाले की, “बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर चित्रपट इंडस्ट्रीमध्ये अंमली पदार्थांची प्रकरणे समोर आली आहेत. चित्रपट इंडस्ट्री अंमली पदार्थांनी ग्रस्त आहे.”

सुनील शेट्टीने आर्यनला संधी देण्याची केली विनंती
यापूर्वी, अभिनेता सुनील शेट्टीने शाहरुख खानचा मुलगा आर्यनला संधी देण्याची विनंती केली होती. तो म्हणाला की, “मुलाला श्वास घेऊ द्या.” आर्यन खानच्या बाबतीत सुनील शेट्टीचे विधान बॉलिवूडमधून प्रथम आले. तो म्हणाला की, “जेव्हा जेव्हा कुठेही एखादा छापा पडतो, तेव्हा एजन्सी त्यात बरेच लोक घेऊन जाते. पण तुम्ही असे गृहीत धरता की, मुलाने ते केले. प्रक्रिया चालू आहे, मला असे वाटत आहे की, मुलाला थोडा श्वास घेऊ द्या. आपण योग्य रिपोर्टची वाट पाहायला पाहिजे.”

एनसीबीने गुप्त माहितीवर केली कारवाई
एनसीबीला सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या द इम्प्रेस नावाच्या आलिशान क्रूझवर बीच-ओशन अंमली पदार्थांची पार्टी आयोजित केली जाणार आहे. यानंतर, एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे, त्यांच्या २२ सदस्यीय टीमसह सामान्य प्रवासी म्हणून क्रूझ जहाजावर चढले. परंतु त्यांनी क्रूझमध्ये बसलेल्या प्रवाशांना क्रूजमध्ये पार्टी सुरू होईपर्यंत कळू दिले नाही. समुद्रात क्रूझने मुंबईची सीमा ओलांडली तेव्हा पार्टी सुरू झाली. येथे शिपवरील लोक उघडपणे अंमली पदार्थ घेऊ लागले. दरम्यान, एनसीबीच्या पथकाने छापा टाकण्यास सुरुवात केली. यामुळे क्रूझवरील लोकांमध्ये खळबळ उडाली.

ही लक्झरी क्रूझ १८०० लोकांसह मुंबई ते गोवा या तीन दिवसांच्या प्रवासासाठी निघाली होती. या शिपमध्ये बॉलिवूड, फॅशन आणि व्यावसायिक जगतातील लोक होते. क्रुझवर अंमली पदार्थ पार्टीला उपस्थित राहिल्याबद्दल एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ सी, २० बी, २७ आणि ३५ अंतर्गत आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित पाच आरोपींना कोठडीत ठेवण्यात आले आहे. यासोबतच क्रूझ रेव्ह पार्टीच्या आयोजकांना समन्सही पाठवण्यात आले आहेत. या आरोपींवर एनडीपीएसच्या कलम ८ सी, २० बी, २७ आणि ३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप

-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ

हे देखील वाचा