Monday, July 1, 2024

आर्यन खानला सकाळी ७ वाजता मिळणार जेलमधील जेवण, ‘या’ गोष्टीसाठी तरसणार शाहरुखचा मुलगा

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज शुक्रवारी (०८ ऑक्टोबर) फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर त्याला जामीन मिळेपर्यंत त्याला आता आर्थर रोड जेलच्या मागे राहावे लागेल. नवीन नियमानुसार, आर्यन आणि इतर ५ आरोपींना बॅरेक क्रमांक १ मध्ये बांधलेल्या विशेष क्वारंटाईन सेंटरमध्ये एकत्र ठेवण्यात आले आहे. ही बॅरेक तुरुंगाच्या पहिल्या मजल्यावर आहे. मात्र, कारागृहात अशी तरतूद आहे की, दोषी ठरण्यापूर्वी आर्यनला हवे असल्यास त्याचे वैयक्तिक कपडे घालता येतील.

जेलमध्ये राहणार शाहरुखचा मुलगा आर्यन
जेलमध्ये असताना आरोपींना कोणतीही सुविधा दिली जाणार नाही. आर्यन खानबद्दल ही बाब खूपच चर्चेत आहे, पण जरी तो सुपरस्टारचा मुलगा असला, तरीही त्याला कोणत्याही प्रकारची वेगळी सुविधा दिली जाणार नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार उर्वरित कैद्यांना मिळणारे जेवण सर्व आरोपींना खावे लागेल. कारागृहात असताना आर्यन खानची संपूर्ण दिवसाचं रुटिंग कसे असेल ते जाणून घेऊया.

आर्यन खान आर्थर रोड जेलमध्ये क्वारंटाईनमध्ये राहणार
आर्यन आणि अरबाज दोघेही नवीन कारागृहाच्या पहिल्या मजल्यावरील बॅरेक क्रमांक १ मध्ये राहतील. तत्पूर्वी, जेलच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नवीन आरोपींना ३ ते ५ दिवस क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात येणार होते. सध्या कोणालाही युनिफॉर्म देण्यात आलेला नाही.

स्पेशल ट्रिटमेंट मिळणार नाही
आर्यनला तुरुंगात कोणतीही विशेष वागणूक दिली जाणार नाही. घरी बनवलेले जेवण जेवण्यासाठी त्याला प्रथम न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. कोर्टाच्या कडक सुचना आहेत की, कोणालाही बाहेरून जेवण दिले जाणार नाही.

सकाळी ६ वाजता उठावे लागेल
उर्वरित कैद्यांप्रमाणेच आर्यनलाही सकाळी ६ वाजता उठावे लागेल. ७ वाजता त्यांना नाश्ता मिळेल, ज्यात फक्त शिरा आणि पोहे दिले जातात. दुपारी आणि रात्री जेवणात रोटी, भाजी आणि डाळ भात मिळेल.

कँटीनमधून जेवण घेऊ शकतो
जर आर्यन जेलमध्ये बनवलेले जेवण खात नाही, तर तो कँटीनमधून जेवण घेऊ शकतो. यासाठी तो मनीऑर्डरद्वारे कुटुंबाकडून पैसे मिळवू शकतो. कॅँटीनमधून जेवण झाल्यावर आरोपी आतमध्ये फिरू शकतो, पण आर्यनला त्याच्या ठेवण्याचा कालावधी संपेपर्यंत परवानगी मिळणार नाही.

संध्याकाळी ६ वाजता जेवण मिळेण
रात्रीचे जेवण फक्त संध्याकाळी ६ वाजता दिले जाते. परंतु जर आरोपीला हवे असेल, तर तो रात्री ८ पर्यंत जेवणाची थाळी त्याच्याकडे ठेवू शकतो. अशा परिस्थितीत आर्यन रात्री आठ वाजेपर्यंत जेवणही करू शकतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘या’ अभिनेत्रीने एका चित्रपटासाठी चक्क स्त्रीचे सौंदर्य खुलवणाऱ्या केसांनाच केले होते बाय- बाय?

-‘गोविंदा गोविंदा’, म्हणत जान्हवीने काढला टॅटू, तर ‘या’ कलाकारांनीही टॅटूद्वारे व्यक्त केलंय आपलं प्रेम

-घटस्फोटानंतर गर्भपात अन् अफेअरच्या अफवांवर समंथाने दिले सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाली, ‘तुम्ही मला कितीही…’

हे देखील वाचा