Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड भ्रष्टाचारांच्या आरोपांमध्ये दिल्लीला पोहचले वानखेडे; ‘कामानिमित्त आलो आहे’, म्हणत दिले स्पष्टीकरण

भ्रष्टाचारांच्या आरोपांमध्ये दिल्लीला पोहचले वानखेडे; ‘कामानिमित्त आलो आहे’, म्हणत दिले स्पष्टीकरण

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची अं’मली पदार्थ प्रकरणी चौकशी होत आहे. यामुळे तो कारागृहात बंद आहे. या बाबतीत चौकशी करणारे आणि भ्रष्टाचारच्या आरोपात फसले गेलेले नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आता दिल्ली येथे पोहचले आहेत. ते दिल्लीला गेल्यापासून सातत्याने अशा बातम्या येत आहेत की, ते कोणत्यातरी चौकशीसाठी गेले होते. परंतु याबाबत बोलताना समीर वानखेडे यांनी सांगितले की, ते कोणत्यातरी कामाच्या संदर्भात दिल्लीला गेले आहेत.

जेव्हा समीर वानखेडे हे दिल्ली विमानतळावरून बाहेर पडले, तेव्हा मीडियाने त्यांना घेरले आणि त्यांना अनेक प्रश्न विचारले. यावेळी माध्यमांना उत्तरे देताना समीर वानखेडे यांनी सांगितले की, हे एनसीबीचे कोणतेही मिशन नाहीये. ते कोणत्यातरी कामानिमित्त दिल्लीला आले आहेत. माध्यमातील वृत्तानुसार समीर वानखेडे यांनी सांगितले की, ते क्रूझ अं’मली पदार्थांची चौकशी करत आहेत आणि याबाबत ते लवकरच मोठी माहिती घेऊन समोर येणार आहेत. (Aryan khan drugs case NCB officer Sameer Wankhede reached delhi says comes here for work no summons)

आर्यनच्या क्रूझ अं’मली केसनंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे अडचणीत सापडले आहेत. कारण या केसचे एक साक्षीदार प्रभाकर यांनी समीर वानखेडे यांच्यावर खंडणी घेतल्याचा आरोप लावला. यानंतर एनसीबीने समीर वानखेडे यांच्या विरोधात कडक आणि वेगाने चौकशी चालू केली. अशातच समीर वानखेडे यांनी सांगितले आहे की, त्यांनी आजपर्यंत करिअरमध्ये कोणतेही चुकीचे कृत्य केले नाही आणि ते कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहेत. यासोबत त्यांचे असे म्हणणे आहे की, त्यांना केवळ घाबरवले जात आहेत.

दुसरीकडे आर्यन खान प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. अजूनही आर्यन खानचा जामीन कोर्टाने स्वीकारला नाहीये. तसेच त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री अनन्या पांडे हिची देखील एनसीबीकडून चौकशी चालू झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कुठलंही धर्मांतर नाही, आम्ही दोघे जन्माने हिंदूच! मात्र, समीरची आई…’, क्रांती रेडेकरच्या ट्वीटने मोठा खुलासा

-आर्यन खान प्रकरण: समीर वानखेडेंनी मागितले ८ कोटी रुपये? साक्षीदाराचा मोठा आरोप

-वानखेडेंवर लावले जातायेत खंडणीचे आरोप, अभिनेत्री क्रांती रेडकरने पोस्ट करून अप्रत्यक्षपणे मांडली पतीची बाजू

हे देखील वाचा