Monday, June 17, 2024

‘कुठलंही धर्मांतर नाही, आम्ही दोघे जन्माने हिंदूच! मात्र, समीरची आई…’, क्रांती रेडेकरच्या ट्वीटने मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक कलाकारांची चौकशी झाली. यातच एनसीबीच्या हाती अंमली पदार्थांचे धागेदोरे लागत गेले. गेल्या काही काळापासून बॉलिवूड इंडस्ट्रीला अंमली पदार्थांच्या प्रकरणामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच आता बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित अंमली पदार्थांचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रविवारी (३ ऑक्टोबर) एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.

जेव्हापासून अंमली पदार्थांची प्रकरणं समोर येत आहेत, तेव्हापासून एक नाव सतत चर्चेत असतं. ते म्हणजे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचं. आपल्या कौतुकास्पद कामगिरीने ते सर्वांची वाहवा मिळवत आहेत. मात्र काही दिवसांपासून अनेक धक्कादायक आरोप त्यांच्यावर केले जात आहेत. त्यांच्यावर ८ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपही केला जात आहे. तर काही लोक या प्रकरणाला हिंदू मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशामध्ये त्यांची पत्नी आणि मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने त्यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे आणि त्यांच्यासोबत ठामपणे उभी राहिली आहे. मात्र अभिनेत्रीने नुकत्याच एका पोस्टद्वारे त्यांच्या कुटुंबाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. तिची सासू म्हणजेच समीर यांच्या आई मुस्लीम धर्माच्या आहेत, असा खुलासा तिने तिच्या लेटेस्ट पोस्टद्वारे केला आहे.

क्रांतीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये अभिनेत्री म्हणतेय की, “मी आणि माझे पती समीर हिंदू म्हणून जन्माला आलो आहोत. मात्र आम्ही इतर धर्मांमध्ये कधीच धर्मांतर केले नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. समीरचे वडील सुद्धा हिंदू आहेत आणि त्यांनी माझ्या मुस्लिम सासूशी लग्न केले आहे. समीरचे पहिले लग्न हे विशेष मॅरेज ऍक्ट अंतर्गत होते, त्याचा २०१६ मध्ये घटस्फोट झाला. दुसरीकडे आमचे लग्न हे सन २०१७ मध्ये हिंदू मॅरेज ऍक्टनुसार झाले आहे.”

आता सोशल मीडियावर या ट्वीटची चर्चा रंगली आहे व ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते अभिनेत्रीसह समीर यांना भरभरून पाठिंबा दर्शवत आहेत. दुसरीकडे आर्यन खानचे प्रकरण आणखी काय वळण घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे हे २०१७ साली लग्नगाठीत अडकले. या जोडप्याला गोड जुळ्या मुली देखील आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वानखेडेंवर लावले जातायेत खंडणीचे आरोप, अभिनेत्री क्रांती रेडकरने पोस्ट करून अप्रत्यक्षपणे मांडली पतीची बाजू

-आर्यन खान प्रकरण: समीर वानखेडेंनी मागितले ८ कोटी रुपये? साक्षीदाराचा मोठा आरोप

-‘हे तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही’, कार्यालयात उशिरा पोहचल्यामुळे समीर वानखेडेंनी अनन्याला धरलं धारेवर

हे देखील वाचा