Tuesday, July 23, 2024

मोठी बातमी! आर्यन खान ड्र’ग्ज केस : NCB पंच प्रभाकर सेलचा मृत्यू

अभिनेता शाहरुख खानचा(Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान(Aryan Khan) 2021 मध्ये अंमली पदार्थ सेवन प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आला होता. आर्यन खानवर झालेल्या अटकेमुळे हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वत्र खळबळ माजली होती. यावेळी अभिनेता सलमान खानसह अनेक दिग्गज अभिनेते शाहरुख खानच्या मदतीला धावले होते. आता या अमली पदार्थ प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. कारण या प्रकरणातील महत्त्वाचा पंच असलेल्या प्रभाकर साईलचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, आर्यन खान ड्रग केस प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. एनसीबीचे पंच आणि या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार प्रभाकर साईलचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात प्रभाकरने असे अनेक खळबळजनक खुलासे केले होते ज्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याने एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर एनसीबीच चौकशीच्या फेर्‍यात अडकली होती आणि समीर वानखेडेंना ही या प्रकरणातून बाहेर पडावे लागले होते. विशेष म्हणजे या प्रकरणात आरोपपत्र दाखल न केल्याबद्दल न्यायालयाने एनसीबीला फटकारल्यानंतर एक दिवस आधी प्रभाकरचा मृत्यू झाला. त्यामुळे या बातमीने चांगलीच खळबळ माजली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर सेल यांचे शुक्रवारी (1 एप्रिल) निधन झाले. चेंबूरच्या माहुल भागातील त्यांच्या घरी प्रभाकर साईलला हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी सांगितले.

तत्पूर्वी एनसीबीने गेल्या वर्षी कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकला होता. त्यावेळी जहाजावर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही उपस्थित होता आणि ही बातमी समोर येताच संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. 2 ऑक्टोबर रोजी छापा टाकल्यानंतर आर्यनला ड्रग्ज पार्टी केल्याप्रकरणी इतर 7 आरोपींसह तात्काळ ताब्यात घेण्यात आले होते. त्याला दुसऱ्याच दिवशी एनसीबीने अटक केली. यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड कारागृहात ठेवले.
आर्यन खान तब्बल २८ दिवस कारागृहाच्या तुरुंगात होता. दरम्यान, या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत होते. यावेळी आर्यनचा एक सेल्फी व्हायरल झाला होता, जो केपी गोसावी यांनी घेतला होता. हा फोटो पाहताच व्हायरल झाला आणि त्यावरून वाद सुरू झाला. यानंतर गोसावी रहस्यमयरीत्या गायब झाली, मात्र त्यानंतर प्रभाकर साईल समोर आला. तो केपी गोसावीचा अंगरक्षक असल्याचा दावा त्यांने केला होता.

प्रभाकर साईलने एनसीबीवर अनेक गंभीर आरोप केले होते. केपी गोसावी आणि सॅम डिसूझा यांनी आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटी रुपये घेतल्याचे त्याने ऐकले आहे असा दावा त्याने केला होता. यामध्ये एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना आठ कोटी रुपये द्यायचे होते. प्रभाकर यांनीही मी कोणत्याही दबावाखाली वक्तव्य करत नाही किंवा पैशासाठी करत नसल्याचेही सांगितले होते. तसेच आपला कोणत्याही मंत्र्याशी संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या खुलाशानंतर ड्रग्ज प्रकरणात सर्व काही बदलले. एनसीबीच चौकशीच्या फेऱ्यात आली होती. आता या महत्वाच्या व्यक्तीचे निधन झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

कधीकाळी नीलमच्या प्रेमात वेडा होता गोविंदा, लग्न करायचं होतं पण ‘या’ कारणामुळे अपूर्णच राहिले प्रेम

अधुरी प्रेम कहाणी! या व्यक्तीमुळे आला ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्यात दुरावा

जेव्हा काजोलने मुलांसह घर सोडण्याचा घेतला होता निर्णय, अशाप्रकारे अजय देवगणने केली होती मनभरणी

हे देखील वाचा