Friday, December 8, 2023

अधुरी प्रेम कहाणी! या व्यक्तीमुळे आला होता ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्यात दुरावा

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rushi Kapoor) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय सुपरस्टार म्हणून ओळखले जात होते. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी हिंदी चित्रपट जगतात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. ऋषी कपूर यांच्या गाजलेल्या चित्रपटांची आजही सर्वत्र चर्चा होत असते. त्याच प्रमाणे ऋषी कपूर यांचे अनेक अभिनेत्रींसोबतची प्रेम प्रकरणही चांगलीच गाजली होती. यामध्ये ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांच्या प्रेम प्रकरणाची सर्वात जास्त चर्चा झालेली पाहायला मिळाली.

दिवंगत सुपरस्टार ऋषी कपूर त्यांच्या पहिल्याच चित्रपट ‘बॉबी’ने रातोरात स्टार बनले होते. 1973 मध्ये रिलीज झालेल्या ‘बॉबी’ या चित्रपटात अभिनेत्री डिंपल कपाडिया ऋषी कपूरसोबत होती आणि ती या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डिंपल आणि ऋषी कपूर यांच्यात जवळीक वाढली होती. आज आम्‍ही तुम्‍हाला ऋषी कपूर आणि डिंपलच्‍या या अपूर्ण प्रेमकहाणीबद्दल सांगणार आहोत आणि जाणून घेऊया की, हे दोघे एकत्र न येण्‍याचे कारण काय होते. असे म्हटले जाते की, ऋषी कपूर आणि डिंपल एकमेकांवर खूप प्रेम करत होते, अगदी ऋषी कपूर यांना डिंपलशी लग्न करायचे होते.

जेव्हा अभिनेत्याने हे त्याचे वडील राज कपूर यांना सांगितले, तेव्हा त्यांनी ऋषी आणि डिंपलच्या नात्याला स्पष्टपणे नकार दिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषी कपूरने वडिलांचे बोलणे टाळले नाही, त्यामुळे त्यांनी डिंपलपासून दूर राहणेच चांगले मानले. दरम्यान, ऋषी कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर डिंपलने इंडस्ट्रीतील पहिले सुपरस्टार म्हटल्या जाणार्‍या राजेश खन्ना यांच्याशी लग्न केले.

त्याच वेळी ऋषी कपूर यांनी अभिनेत्री नीतू हिच्याशी लग्न केले. राजेश खन्नासोबत लग्न केल्यानंतर डिंपलने स्वत:ला चित्रपटांपासून दूर केले होते आणि ती बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर होती. मात्र, चित्रपटांमधून दीर्घ विश्रांती घेतल्यानंतर डिंपलने पुन्हा एकदा पुनरागमन करण्याचा निर्धार केला होता. डिंपलचा कमबॅक चित्रपट ‘सागर’ होता आणि अभिनेत्रीच्या बरोबर फक्त ऋषी कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. असे म्हटले जाते की, चित्रपटात ऋषी कपूर आणि डिंपल यांच्यावर खूप बोल्ड सीन चित्रित करण्यात आले होते आणि चित्रपटाच्या प्रीमियम दरम्यान पत्नी नीतूसोबत आलेले ऋषी खूपच घाबरले होते. (rushi kapoor and dimple kapadia lovestory)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
धक्कदायक! ‘या’ फॅशन डिझायनरने केली आत्महत्या, इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत म्हणाली, “माझा हा शेवटचा व्हिडीओ…”

सीता नवमीच्या दिवशी आदिपुरुषमधील ‘जानकी’चा लूक समोर, अश्रुंमधून वेदना वक्त करणाऱ्या क्रितीने वेधले लक्ष

हे देखील वाचा