बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अं’मली पदार्थ प्रकरणात अटक केल्यानंतर, गुरुवारी (२८ नोव्हेंबर) जामीन मंजूर झाला आहे. मागील अनेक दिवस हायकोर्टात त्याच्या वकिलांनी त्याच्या जामीनासाठी याचिका केली होती, परंतु त्याचा जामीन मंजूर झाला नव्हता. त्याला अटक झाल्यापासून त्याच्या कुटुंबात दुःखाचे वातावरण होते. परंतु अशातच त्याच्या जामीनाची बातमी समजताच त्याच्या कुटुंबाचा आनंद परत आला आहे. हा आनंद आर्यनच्या भावंडाना देखील खूप झाला आहे. सुहाना खानच्या पोस्टसोबत आर्यनचा लहान भाऊ अबरामचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो आनंदाने त्याच्या वडिलांची कॉपी करताना दिसत आहे.
आर्यनच्या जामीनाची बातमी येताच शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर त्याचे चाहते गर्दी करत आहेत. आपला मोठा भाऊ लवकरच घरी येण्याच्या आनंदात छोट्या अबरामला देखील खूप आनंद झाला आहे. तो घराबाहेर जमलेल्या चाहत्यांसमोर आणि मीडिया समोर शाहरुख खानप्रमाणे हात हलवताना दिसत आहे. या व्हिडिओमधून त्याच्या चेहाऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. इतक्या दिवसांनी आपला भाऊ घरी येणार या विचाराने तो आनंदात दिसत आहे. त्यांचा हा मन्नतवरील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Aryan khan gets bail abram waves at crowd from mannat as father khan)
#WATCH | Earlier visuals from actor Shah Rukh Khan's residence 'Mannat' in Mumbai after the grant of bail by Bombay High Court to his son Aryan in the drugs-on-cruise case pic.twitter.com/nCtoT7KuEf
— ANI (@ANI) October 28, 2021
या प्रकरणात आर्यन खानसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा देखील जामीन हायकोर्टाने मंजूर केला आहे. सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड कलाकार आर्यनला जामीन मिळाला म्हणून त्यांचा आनंद व्यक्त करत आहेत. जेलमध्ये असताना अनेकांना त्याला पाठींबा दिला आहे.
आर्यन खानची बहीण सुहाना खानने देखील त्याच्या जामिनीची बातमी ऐकता क्षणी सोशल मीडियावर शाहरुख खान आणि आर्यन सोबतचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. हे त्यांच्या बालपणीचे फोटो आहेत. ज्यात आर्यन आणि सुहाना त्यांच्या वडिलांसोबत मस्ती करताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करून तिने “आय लव्ह यू” असे लिहिले होते. तिची ही पोस्ट देखील सध्या जोरदार चर्चेत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यनला जामीन मंजूर, ‘मन्नत’वर साजरी होणार दिवाळी
-आर्यन खानला अटक झाल्यापासून ते जामीन मिळेपर्यंत काय काय घडलं? एका क्लिकवर घ्या जाणून
-आर्यनला जामीन न मिळाल्यामुळे ऋतिकने पुन्हा दर्शवला होता पाठिंबा; म्हणाला, ‘हे सर्व अत्यंत…’