Monday, July 1, 2024

मोठी घडामोड! एकीकडे जामीन अर्जावर सुनावणी सुरु असतानाच आर्यन खानची आर्थर रोड कारागृहात रवानगी

मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्ये एकाच विषयाची सर्वाधिक चर्चा सुरु आहे, ते म्हणजे आर्यन खान. सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने क्रुझ पार्टीतून अं’मली पदार्थ प्रकरणी अटक केली आहे. या गंभीर प्रकरणात आर्यन खान ७ ऑक्टोबरपर्यंत नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) कस्टडीत होता. अशामध्ये आर्यनचे वकील सतीश मानेशिंद लवकरात लवकर आर्यनला जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्राप्त माहितीनुसार गुरुवारी (७ ऑक्टोबर) या प्रकरणात पुन्हा सुनावणी सुरू झाली. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आज (८ ऑक्टोबर) रोजी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु आहे. मात्र. एक महत्वाची घडामोड समोर येत आहे, ती म्हणजे आर्यन खान याला आर्थर रोड कारागृहात हलवण्यात आले आहे. एकीकडे न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी सुरु आहे. त्याला दुसरीकडे त्याला मेडिकल टेस्ट करुन आर्थर रोड तुरुंगात नेण्यात आले आहे. आर्यनसह आठही आरोपींना आर्थर रो़ड तुरुंगात नेण्यात आलं आहे.

आर्यन खानवर एनसीबीने एनडीपीएस कायद्यांतर्गत ४ कलमे लावली आहेत. यामध्ये कलम ८ सी आहे, ज्यामध्ये अं’मली पदार्थांच्या उत्पादनापासून ते ताबा, विकणे, विकत घेणे, वापर करणे यांच्या तरतूदी आहेत. दुसरे कलम २० बी आहे, जे गांजाशी संबंधित आहे. तिसरे कलम २७ आहे, जे अं’मली पदार्थाच्या सेवनाशी संबंधित आहे. तसेच आणखी एक कलम ३५ आहे. आर्यन खान अद्याप एनसीबीच्या कस्टडीत आहे. त्याचे हे प्रकरण देशातील प्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे सांभाळत आहेत. सतीश हे अशा प्रकरणांसाठी प्रसिद्ध आहेत. (Does Superstar Shahrukh Khans Son Aryan Khan Will Get Bail On 7 October)

आर्यनचे या प्रकरणात नाव समोर आल्यापासून बॉलिवूडला धक्का बसला आहे. अनेक कलाकार त्याच्या समर्थनार्थ उतरले आहेत. नुकतेच मिका सिंग, सुझेन खान यांनी आर्यनला पाठिंबा दर्शवला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जस्सी’ म्हणून झाली लोकप्रिय, तर अश्लील एमएमएस लीक झाल्यामुळे मोना सिंग सापडली होती वादात

-‘हिंदी मीडियम’ फेम सबा कमरला मशिदीत डान्स करणं पडलं महागात, पाक कोर्टाने दाखल केली एफआयआर

-शमिता शेट्टीला ‘आंटी’ म्हणणे करण कुंद्राला पडले महागात, अभिनेत्रीच्या आईने केली कानउघडणी

हे देखील वाचा