Wednesday, December 4, 2024
Home बॉलीवूड शाहरुखचा मुलगा आर्यन खान बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सज्ज, ‘या’ माध्यमातून करणार पदार्पण

शाहरुखचा मुलगा आर्यन खान बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सज्ज, ‘या’ माध्यमातून करणार पदार्पण

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने बॉलिवूड जगतात एकापेक्षा एक रोमँटिक चित्रपट करून प्रसिद्धी मिळवली. तो आपल्या मेहनतीच्या जोरावर आज बॉलिवूडचा बादशाह बनला आहे. आजही तो लाखो तरुणींच्या हृदयावर राज्य करत आहे. आता शाहरुखचा मुलगा आर्यन खानही त्याच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. जर तुम्ही आर्यनच्या बॉलिवूडमधील एन्ट्रीचा अंदाज लावत असाल तर तुम्ही बरोबर आहात. वडील शाहरुखही आर्यनच्या बॉलिवूडमध्ये येण्याबाबत अनेकदा बोलला आहे. मात्र, आर्यन चित्रपटसृष्टीत नायक म्हणून नव्हे, तर लेखक म्हणून पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. त्याच्या प्रोजेक्ट्सबद्दल मिळालेल्या बातम्यांवरून असे दिसते आहे की, आर्यन लवकरच त्याची प्रतिभा पडद्यावर सादर करेल.

माध्यमांतील वृत्तानुसार, आर्यन (Aryan Khan) कोणत्याही आवाजाशिवाय फीचर फिल्म्स आणि वेबसीरीज बनवण्यासाठी त्याच्या कल्पनांवर काम करत आहे. एका जवळच्या सूत्राने सांगितले की, सध्या सुरू असलेल्या कल्पनांमध्ये अमेझॉन प्राईमच्या वेबसिरीजसाठी दोन आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटद्वारे निर्मित एक फीचर फिल्मचा समावेश आहे. अमेझॉन प्राईम सीरिज एका डाय-हार्ड फॅनबद्दल आहे. ज्याच्या कथेमध्ये थ्रिलर देखील असतील. फीचर फिल्मबद्दल तपशील अद्याप समोर आलेला नाही. सर्व काही सुरळीत राहिल्यास यावर्षी प्लॅटफॉर्मला ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे.

या स्क्रिप्ट्स सध्या विकासाच्या टप्प्यात आहेत. जेव्हा ते स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या सर्व गरजा पूर्ण करतील, तेव्हा त्यांना ग्रीन सिग्नल मिळेल. या दोन कल्पनांशिवाय आर्यन इतर कथांवरही काम करत आहे. सूत्राने असेही सांगितले की, आर्यन सह-लेखक बिलाल सिद्दीकीसह ते पूर्ण करत आहे.


सुहाना खानला आहे अभिनयात रस

शाहरुखने (Shahrukh Khan) आर्यनच्या लिखाणात रुची असल्याबद्दलही अनेकदा सांगितले आहे. आर्यनला लिहायला आवडते आणि आता तो त्याच्या प्रतिभेला आकार देण्याकडे वाटचाल करत असल्याचे त्याने सांगितले आहे. एकीकडे आर्यन लेखक म्हणून, तर दुसरीकडे शाहरुखची मुलगी सुहाना खान अभिनयाकडे वाटचाल करत आहे. झोया अख्तरच्या वेबसीरिजमधून सुहाना पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरू आहे. जी आर्ची कॉमिक्सवर आधारित असेल.

Photo Courtesy Instagramgaurikhan

अं’मली पदार्थ प्रकरणानंतर आयपीएल लिलावात सार्वजनिक उपस्थिती

आर्यन खान नुकताच आयपीएलच्या लिलावात दिसला होता. अं’मली पदार्थ प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर त्याची ही पहिलीच सार्वजनिक हजेरी होती. हे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला.

हेही वाचा –

बुरखा घालून चित्रपट पाहायला गेलेल्या माधुरी दीक्षितला ‘या’ कारणामुळे अर्धवट चित्रपट सोडत काढावा लागला होता पळ

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा