Monday, August 4, 2025
Home बॉलीवूड नुसरतने मुलाचे ‘हे’ नाव ठेवताच ट्रोलर्सने साधला निशाणा; म्हणाले, ‘यश दास आहे का बाप?’

नुसरतने मुलाचे ‘हे’ नाव ठेवताच ट्रोलर्सने साधला निशाणा; म्हणाले, ‘यश दास आहे का बाप?’

बंगाली चित्रपट अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँने अलीकडेच मुलाला जन्म दिला आहे. मुलाच्या जन्मानंतर आता नुसरतला लवकरच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकतो. मुलाच्या जन्मापासून नुसरत सातत्याने चर्चेचा विषय ठरत आहे. नुसरतला प्रश्न विचारला जात आहे की, मुलाच्या वडिलांचे नाव काय आहे? नुसरत सतत सोशल मीडियावर ट्रोलर्सची शिकार होत आहे. दरम्यान, नुसरतने तिच्या मुलाच्या नावाबद्दल देखील खुलासा केला आहे. मुलाच्या नावामुळे देखील पुन्हा तिच्यावर प्रश्नांची झुंबड उडाली आहे.

नुसरतने आपल्या मुलाचे नाव ‘ईशान’ ठेवले आहे आणि इंग्रजीमध्ये ते ‘Yishaan’ म्हणून ओळखले जाईल. या नावाने चाहते आणि ट्रोलर्स सोशल मीडियावरून तर्क-वितर्क लावत आहेत की, हे मूल अभिनेता यश दासगुप्ताचे आहे. वास्तविक, हे कारण आहे की, मुलाचे नाव यशशी जुळत आहे. एवढेच नाही, तर यश देखील रुग्णालयात नुसरतसोबत संपूर्ण वेळ उपस्थित होता, अशी माहिती मिळाली आहे. मुलाच्या जन्मानंतर, त्याने प्रथम सांगितले की, नुसरत आणि नवजात पूर्णपणे निरोगी आहेत.

यापूर्वी देखील नुसरत गरोदरपणात अनेकदा यश दासगुप्तासोबत दिसली होती. ते दोघे बरेचदा एकत्र जेवायला जात होते. सोशल मीडियावर देखील त्यांच्या जवळीकतेच्या कथा अनेकदा व्हायरल होतात.

नुसरत तिच्या पतीपासून वेगळी झाली आहे. नुसरतने आधीच जाहीर केले आहे की, त्यांचे लग्न कायदेशीर नव्हते आणि ती निखिल जैनसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. यासोबतच निखिल जैनने देखील या मुलाचे वडील नसल्याचाखु लासा केला आहे. कारण नुसरत लग्नाच्या काही महिन्यांनंतरच तिचे सर्व सामान घेऊन निघून गेली होती.

नुसरतने तुर्कीच्या विवाह नियमांनुसार साल २०१९ मध्ये व्यावसायिक निखिल जैनशी लग्न केले होते. त्यामुळे या लग्नाला भारतात कायदेशीर मानले जाणार नाही. निखिल जैनने यावर्षी ८ मार्च रोजी नुसरतच्या विरोधात त्यांचा विवाह रद्द केल्याबद्दल दिवाणी दावा दाखल केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा