आज बिग बॉस या शोचा स्पर्धक असलेल्या अभिनेता अश्मित पटेलचा वाढदिवस. अश्मित हा बॉलिवूडची अभिनेत्री अमिषा पटेल हिचा लहान भाऊ. १३ जानेवारी १९७८ साली अश्मितचा जन्म झाला. आज तो त्याचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या आयुष्यतील काही खास गोष्टी.
अश्मितला जरी हिंदी सिनेसृष्टीत पाहिजे तसे यश मिळाले नसले तरी तो प्रसिद्ध नक्कीच आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अश्मितचे वैयक्तिक आयुष्य. तो नेहमीच त्याच्या कामापेक्षा जास्त खाजगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. २००३ साली अश्मितने ‘इंतेहा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. मात्र हा चित्रपट काही खास चालला नाही.
अश्मितची जास्त चर्चा त्याच्या पदार्पणापेक्षा MMS चीच झाली. अश्मित आणि अभिनेत्री रिया सेन यांचा एक MMS त्यावेळी लीक झाला होता. २००५ साली हे दोघे जवळ आले आणि त्यांच्या अफेयर असल्याच्या बातम्यांनी जोर धरला. त्याच वेळेस या दोघांनी वासू भगनानीच्या ‘सिलसिले’ चित्रपटात एकत्र काम केले होते.
अश्मित, रियाचा अश्लील MMS लीक झाल्यांनतर त्या दोघांना खूप बदनामी सहन करावी लागली. ९० सेकंदाचा हा व्हिडिओ एका हॉटेलमध्ये शूट केला होता. या व्हिडिओमध्ये अश्मित आणि रिया संदिग्ध अवस्थेत दिसत होते. त्यानंतर या दोघांना माध्यमांसमोर येऊन झालेल्या सर्व प्रकारावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. हा व्हिडिओ लोक झाला तेव्हा रिया सेन इंडस्ट्रीमध्ये स्थिर आणि प्रसिद्ध झाली होती. असे म्हणतात की, हा MMS अश्मितने स्वतः इंटरनेटवर अपलोड केला होता. कारण अश्मितला तेव्हा प्रसिद्धी पाहिजे होती आणि रिया तेव्हा चांगलीच प्रसिद्ध होती. याचमुळे त्याने असे केल्याचे म्हटले जात होते.
हा MMS लीक झाल्यानंतरच अश्मितला मर्डर, नजर, फाइट क्लब असे चित्रपट मिळाले. २००७ साली अश्मित टेलिव्हिजन विश्वातला सर्वात विवादित शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिग बॉसच्या चौथ्या पर्वता स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. या शो मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक सोबत त्याचे अफेयर सुरु झाले होते. मात्र बाहेर आल्यावर हे दोघं वेगळे झाले.
त्यानंतर अश्मितचे नाव अभिनेत्री महक चहल सोबत जोडले गेले. या दोघांनी २०१८ साली स्पेनमध्ये साखरपुडा केला. अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी साखरपुडा केला. लवकरच ते दोघे लग्न देखील करणार होते. मात्र मधेच माशी शिंकली आणि ही दोघे वेगळी झाली.










