Wednesday, June 26, 2024

अशनीर ग्रोवरची बिग बाॅसवर जहरी टिका; म्हणाला, ‘अयशस्वी लोकांचा शो’

शार्क टँक इंडिया‘ सीझन 1 मध्ये जज म्हणून प्रसिद्धीच्या झाेत्यात येणारा अशनीर ग्रोव्हर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अशनीर गाेवर याने नुकतेच एका मुलाखतीत सलमान खान हाेस्ट शाे बिग बाॅस शाेवर टिका केली आहे. ज्यामुळे ताे चांगलाच चर्चेत आला आहे.

तर झाले असे की, माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत अशनीर (ashneer grover) म्हणाला की, “तो सलमान खान होस्ट केलेल्या बिग बॉसमध्ये कधीही भाग घेणार नाही.” यावर अशनीरला बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची ऑफर आली आहे का? असे विचारले असता. तो म्हणाला, “हो, त्यांनी मला ऑफर केले होते, पण मी त्यात जाण्यास नकार दिला.” अशनीरला शोमध्ये का सहभागी होत नाही असे विचारले असता तो म्हणाला, “त्यांच्या शाेमध्ये आयुष्यात अपयशी ठललेली लोक असतात, यशस्वी लोक नाहीत.”

अश्नीर ग्रोव्हरने असेही सांगितले की, “पूर्वी तो बिग बॉस पाहायचा, पण आता त्याने ते पाहणे बंद केले आहे. यामागचे कारण सांगताना ताे म्हणाला की, “हा शो आता ‘शिळा’ झाला आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashneer Grover (@ashneer.grover)

अश्नीर ग्रोवरने माधुरी जैन ग्रोवरसोबत लग्न केले आहे. त्याला तिच्यापासून 2 मुलेही आहेत. अश्नीर ग्रोव्हर सोशल मीडियावर आपल्या कुटुंबाशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असताे.

‘शार्क टँक इंडिया’ सीझन 2 शो लवकरच सोनी टीव्हीवर प्रसारित होईल. यामध्ये विनिता सिंग, नमिता थापर, अमन गुप्ता, अनुपम मित्तल, पियुष बन्सल आणि अमित जैन हे जज म्हणून दिसणार आहेत. अश्नीर ग्रोवर शार्क टँक इंडिया सीझन 1 मध्ये जज म्हणून दिसला होता, पण आता तो दुसऱ्या सीझनचा भाग नाही. डिसेंबर 2021 रोजी हा शो पहिल्यांदा टीव्हीवर प्रसारित झाला. हा शो रिलीज होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यामुळे या शोच्या जजनाही खूप पसंती मिळाली.

शार्क टँक इंडिया नवोदित उद्योजकांना त्यांच्या कल्पना मांडण्याची संधी देत ​​असताे. त्यांच्या कल्पनांच्या आधारे जज त्यांच्या व्यवसायात पैसे गुंतवतात. हा शो अमेरिकन बिझनेस रिऍलिटी शोवर आधारित आहे. यामध्ये अश्नीर ग्रोव्हर हे जज म्हणून गुंतवणूकदार होते. ते भारत पेचे संस्थापक होते. मात्र, त्यांच्या बिनधास्त वृत्तीमुळे आणि कडक शब्दांमुळे ते लोकांमध्ये चर्चेचे कारण बनले होते. यामुळे त्याला शोमधून बाहेरही काढण्यात आले हाेते, पण यासंदर्भात त्याच्या वागण्यात कोणताही बदल झालेला नाही. ( ashneer grover called actor salman khan hosted show bigg boss stale says its a show of unsuccessful people)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘ज्या वयात मुलं खेळायची, माझा मुलगा इंजेक्शन मोजायचा’, कँसरग्रस्त मुलाचे हाल ऐकून अमिताभही भावूक

रिलीजनंतर 13व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर राडा करतोय अजयचा ‘दृश्यम 2’, छापले तब्बल ‘एवढे’ कोटी

हे देखील वाचा