Friday, April 19, 2024

स्पर्धकांचे प्रोडक्ट पाहून सुटला अशनीर ग्रोव्हरचा संयम, थेट पदवीवर केले प्रश्न उपस्थित

‘शार्क टँक इंडिया टीव्ही’ शो सध्या प्रचंड चर्चेत आहे. शोमध्ये दिसणारा अशनीर ग्रोव्हर सध्या कठीण काळातून जात आहे. अशनीरचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यात त्याचे असभ्य वर्तन दिसत आहे. शोचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अशनीर एका स्पर्धकाला चांगलाच ओरडताना दिसत आहे. मात्र, त्याच्यासोबत बाकीचे परीक्षक देखील स्पर्धकांवर कडकपणा दाखवताना दिसत आहेत.

अशनीरने स्पर्धकांना दिले धडे
व्हिडिओबद्दल सांगायचे झाले, तर ३ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये अशनीर खूप (Ashneer Grover) रागात आहे आणि स्पर्धकाना फटकारताना दिसत आहे. स्पर्धक सर्व परीक्षकांसमोर आपला परिचय देतो आणि आपला आविष्कार देखील दाखवतो. पण अशनीरला त्याचे काम आवडले नाही असे दिसते. त्यामुळेच त्याने स्पर्धकांच्या नियमानुसार शाळा घेतली. स्पर्धकाला काहीच माहीत नसून त्याचा अभ्यास वेस्ट असल्याचे त्याने सांगितले. तो काहीही करत नाही आणि फक्त त्याचे आयुष्य वाया घालवत आहे.

स्पर्धकांनी देखील स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. अशनीर म्हणाला की, “हे काय बनवताय? नेहरू प्लेसच्या फूटपाथवर १५ रुपयांना विकला जातं. तुम्ही जर्मन विद्यापीठातून कोणाची तरी जागा खराब केली आहे. हे काय केले.” स्पर्धकाने सांगितले की, तो फक्त जर्मनमध्ये विनोद करत नाही आणि खूप मेहनत करतो. खूप अभ्यास केला आहे. पण अशनीर आणि अनुपम मित्तल यांनी स्पर्धकाची चांगलीच शाळा घेतली.

पियुषने दिले प्रोत्साहन 

मात्र, काही प्रेक्षकांनी त्याला प्रोत्साहन देण्याचाही प्रयत्न केला. लेन्स कार्टचा संस्थापक पीयूष बन्सलने स्पर्धकांचे सांत्वन केले. तो म्हणाला की, स्पर्धकाचे आयुष्य त्याच्या आयुष्याशी बऱ्याच अंशी जुळते. त्यामुळे अजूनही काहीही चुकीचे नाही आणि ते त्यांच्या आयुष्यात बरेच काही करू शकतात. व्हिडीओवर चाहतेही भरपूर कमेंट करत आहेत.

त्याचबरोबर अशनीर ग्रोव्हर कंपनीसोबत एका नव्या वादात अडकला आहे. मात्र, कंपनीच्या संचालक मंडळासोबत सुरू असलेल्या वादावरून त्याने नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता एका नवीन अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, अशनीर आणि त्याची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हरने कंपनीच्या निधीचा गैरवापर केला. त्यांची लाईफस्टाईल किती आलिशान होती. याचा अंदाज त्यांनी डायनिंग टेबल आणि कारवरच दहा कोटी रुपये खर्च केला यावरून लावता येतो.

कंपनीच्या निधीचा गैरवापर
कर्मचार्‍यांच्या हवाल्याने एका अहवालात म्हटले आहे की, कंपनीच्या निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून भारतपे पदांवरून काढून टाकण्यात आलेल्या अशनीर ग्रोवरने कंपनीत असताना एक पोर्श कार खरेदी केली होती. यासोबतच अशनीरने स्वतः कंपनीशी संबंधित लोकांना सांगितले होते की, त्याने फक्त एका डायनिंग रूम टेबलवर $१,३०,००० इतकी मोठी रक्कम खर्च केली आहे. विशेष म्हणजे अशनीर यांच्या राजीनाम्यानंतर भारतपे मंडळाने त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर कंपनीच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. आता या अहवालात या पती-पत्नीने कंपनीचे पैसे घेतल्याचेही स्पष्ट केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा