Saturday, June 29, 2024

मैत्री असावी तर अशी! रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक सराफ भावूक; म्हणाले, ‘एक जीवलग मित्र…’

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांनी अखेरचा निरोप घेतला आहे. त्यांचा मृतदेह शुक्रवारी पुण्यातील तळेगाव दाभाडेजवळ येथील राहत्या घरी सापडला आहे. त्याच्या मृत्युची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि सिनेसृष्टीत शोककाळा पसरली आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनावर अनेक मराठी कलाकारांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत. ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे.

अशोक सराफ (Ashok Saraf)  म्हणाले की, “जे घडलंय ते खूप वाईट आहे. आमच्या पिढीतला सर्वात देखणा आणि रूबाबदार नट गेला आहे असं मला वाटत आहे. आम्ही दोघांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. ज्यामध्ये तो हिरो म्हणुन झळकला. तर मी साईड हिरो म्हणुन काम केले आहे. एक खूप चांगला माणूस, एक जीवलग मित्र गेल्याने खूप दुःख होत आहे. तो नेहमी हसत खेळत वावरणारायचा. रवींद्र महाजनीमधील प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा गुण होता, तो प्रत्येक भूमिका उत्तम साकारायचा.”

हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटात पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. हा त्याचा पहिला चित्रपट होता. यानंतर त्यांनी ‘आराम हराम आहे’, ‘दुनिया करी सलाम’, ‘हळदी कुंकू’ या मराठी चित्रपटांमध्ये काम केले. ‘मुंबई चा फौजदार’ (1984), ‘कलत नकळत’ (1990) हेही त्यांचे प्रसिद्ध चित्रपट होते. त्याचा ‘लक्ष्मी ची पावले’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला.

रवींद्र महाजनी यांनी आपल्या करिअरच्या मध्यभागी ब्रेक देखील घेतला, त्यानंतर त्यांनी 2015 मध्ये ‘काय राव तुमही’ चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. यानंतर 2019 मध्ये आलेल्या अर्जुन कपूर आणि क्रिती सेनॉनच्या ‘पानिपत’ या चित्रपटातही पिता-पुत्राने एकत्र काम केले होते. या चित्रपटात रवींद्र महाजनी यांनी सरदार मल्हारराव होळकर यांची भूमिका साकारली होती. रवींद्र महाजनी यांचा हा शेवटचा चित्रपट ठरला.

अधिक वाचा-
‘टॅक्सी ड्रायव्हर’ ते अभिनयातील ‘देवता’! ‘या’ सिनेमाने रवींद्र महाजनी यांचा नऊ वर्षाचा संघर्ष संपवल
Breaking! देवता चित्रपटातील नायक, प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन, बंद घरात सापडला मृतदेह

हे देखील वाचा