Saturday, September 30, 2023

Breaking! देवता चित्रपटातील नायक, प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन, बंद घरात सापडला मृतदेह

मराठी चित्रपटातील सर्वात देखणे अभिनेते अशी ओळख असलेले, ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मृत्यू झाला आहे. मावळमधील आंबी येथील एका सदनिकेत त्यांचा मृतदेह एका बंद खोलीत आढळला. सुमारे दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते अनेक दिवसांपासून इथे वास्तव्यास होते. त्यांच्या घरातून वास येऊ लागल्याची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. रवींद्र महाजनी यांच्या आकस्मिक जाण्याने कला क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रवींद्र महाजनी यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटात अजरामर भूमिका साकारल्या आहेत. त्यांचे देवता, मुंबईचा फौजदार, झुंज, लक्ष्मी, गोंधळात गोंधळ, हळदी कुंकू हे चित्रपट प्रचंड गाजले. तसेच दिग्दर्शक, निर्माता म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. अभिनेत्री रंजना, उषा नाईक व आशा काळे आदींसोबत त्यांनी चित्रपट केले. खेळ कुणाला दैवाचा कळला हे त्यांचे प्रसिद्ध गीत कुणीही विसरू शकत नाही. ( Famous Marathi Veteran Actor Ravindra Mahajani Died In Maval Taluka At Pune )

अधिक वाचा –
– टॉमेटोच्या किंमतीवर बोलणाऱ्या सुनील शेट्टीवर सदाभाऊ खोत संतापले; म्हणाले, ‘तुमच्यासारख्या भिकाऱ्यांच्या…’
– “आमच्या शोमध्ये जास्त चालत नाही” म्हणत ‘या’ दिग्गज विनोद अभिनेत्याने व्यक्त केले पुरुषांनी स्त्री पात्र साकरण्यावर मत

हे देखील वाचा