मराठी मनोरंजनविश्वातील दिग्गज अभिनेते आणि निर्माते असलेल्या महेश कोठारे यांना ओळखत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. त्यांनी त्यांच्या जीवनाची जवळपास सर्वच वर्ष मनोरंजनविश्वासाठी दिली आहे. बालकलाकार म्हणून त्यांनी त्यांचा अभिनयच प्रवास सुरु केला. या प्रवासात त्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. नक्कीच व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य दोन्ही मिळून. आज सत्तरीच्या आसपास आलेल्या महेशजी यांचा उत्साह आणि कामाबद्दलचे प्रेम नक्कीच कौतुकास्पद आहे. महेशजी यांनी त्यांच्या या प्रवासात अनेक चढ उतार पाहिले, नवनवीन टप्प्यावर नवनवीन अनुभव आले तर सर्व त्यांनी पुस्तक रूपाने त्यांच्या चाहत्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे.
हो, नुकतेच महेश कोठारे यांनी त्यांचे ‘डॅम इट आणि बरंच काही’ हे आत्मचरित्र प्रकाशित केले. मुंबईत दादर येथील श्री शिवाजी मंदिरात हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी सिनेविश्वातील सर्वच दिग्गजांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महेश कोठारे यांची पत्नी, मुलगा-सून, त्यांचे जवळचे मित्र सचिन पिळगावकर, अभिनेत्री निवेदिता सराफ आदी अनेक दिग्गज उपस्थित होते. असे असूनही महेश कोठारे यांचे अतिशय जवळचे आणि लाडके मित्र अशोक सराफ नसल्याने अनेकांना त्याचे आश्चर्य वाटले.
View this post on Instagram
मात्र अशोक सराफ हे का या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही? याचे कारण त्यांची पत्नी आणि अभिनेत्री असलेल्या निवेदिता सराफ यांनी सगळ्यांना सांगितले, आणि ते कारण ऐकून नक्कीच त्यांचे फॅन्स हैराण झाले आहे. निवेदिता सराफ यांनी या सोहळ्यात बोलताना अशोर सराफ न येण्याचे कारण सांगताना त्या म्हणाल्या की त्यांना ‘लॅरिन्जायटिस’ हा आजार झाला आहे. त्या यावेळी म्हणाल्या की, “अशोक कार्यक्रमाला आला नाही कारण त्याला लॅरिन्जायटिस झाला आहे. त्याला बोलायला त्रास होत आहे. या आजारामुळे त्यांचे काही नाटकाचे प्रयोगही रद्द करावे लागले. मात्र अशोक नेहमीच महेशच्या पाठीशी एक मित्र आणि अभिनेता म्हणून उभा आहे.”
काय आहे नक्की लॅरिन्जायटिस हा आजार. लॅरिन्जायटिस हा तसा गंभीर आजार नाही. या आजारात घशाला सूज येते. त्यामुळे स्वरयंत्रणांना त्रास जाणवतो. या आजारामुळे व्यक्तीला बोलण्यातही त्रास जाणवतो. हा आजार झालेल्या व्यक्तीचा आवाज बदलतो किंवा घोगरा होतो. घसा दुखणे, डोकेदुखी, ताप, खोकला ही या आजाराची लक्षणे आहेत. पण योग्येवेळी उपचार घेतले नाही तर गंभीर समस्या उद्भवू शकते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सतत ड्रेस सावरताना दिसली भोजपुरी स्टार आम्रपाली दुबे
हसरा चेहरा इतिहास गेहरा! गौरी नलावडेचा शाइनी लूक










