Friday, March 29, 2024

वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सतत ड्रेस सावरताना दिसली भोजपुरी स्टार आम्रपाली दुबे

भोजपुरी अभिनेत्री किंबहुना भोजपुरी इंडस्ट्रीमधील सुपरस्टार असलेल्या आम्रपाली दुबेने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस तिने खूपच खास पद्धतीने साजरा केला. तिला सोशल मीडियाच्या मध्यमातून तिच्या फॅन्स आणि कलाकारांकडून भरभरून शभेच्छा मिळाल्या. आम्रपालीच्या वाढदिवसाची जंगी पार्टी झाली. यादरम्यान तिचा लूक सर्वांच्याच नजरेचे आकर्षण ठरला. या पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये आम्रपाली खूपच मादक आणि सुंदर दिसत आहे.

आम्रपाली दुबे यांच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये आम्रपाली तिच्यात वाढदिवसाचे सरप्राईज पाहून खूपच खुश झाली. आम्रपालीने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यातल्या फोटोंमध्ये आम्रपाली फोनमध्ये व्यस्त दिसत आहे, मात्र तिचा हॉट लूक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तिच्या या फोटनवर तिच्या फॅन्स भरभरु कमेंट्स करत आहेत. या पार्टीमध्ये आम्रपालीने काळ्या रंगाच्या हाय थाई स्लिट शिमरी गाऊन घातला आहे. त्यावर तिने केस मोकळे सोडले असून, त्यावर डायमंड कानातले आणि एक घड्याळ घातले आहे. तिचा हा लूक तिला खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश बनवत असून, ती तिच्या या हॉट ड्रेसला सांभाळताना दिसली.

आम्रपालीने तिच्या या पार्टीचे फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “वाढदिवसाची पार्टी. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांनी माझा वाढदिवस अधिकच खास झाला. जर मी कोणाची शुभेच्छांची पोस्ट किंवा मेसेज पाहू शकली नसेल तर माफ करा. मी पूर्ण प्रयत्न करते की सर्वांना धन्यवाद म्हणू शकू. पुन्हा सर्वांना धन्यवाद.” तत्पूर्वी आम्रपाली दुबे भोजपुरी इंडस्ट्रीमधील मोठी अभिनेत्री असून, तिच्या फॅन्स संपूर्ण जगात पसरलेले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अमृता फडणवीसांच ‘मूड बना लिया’ गाण्याने घातलाय धुमाकूळ! पोस्ट शेअर करत म्हणाल्या, ‘जल्लोष संपण्याचं…,’
आदिलसोबत लग्नावर राखी सावंतने ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, ‘मी खूप….’

हे देखील वाचा