आशुतोष गोवारीकर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट चांगलेच लोकप्रिय ठरले आहेत. फक्त दिग्दर्शनातच नव्हे तर आशुतोष गोवारीकर यांनी लेखन आणि अभिनयात सुद्धा छाप पाडली आहे. मालिकेत अभिनेते म्हणून त्यांनी आपल्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. आज (15 फेब्रुवारी) आशुतोष गोवारीकर यांचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहेत पाहूया त्यांनी दिग्दर्शित केलेले दर्जेदार चित्रपट. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेले अनेक चित्रपट आजही लोकप्रिय आहेत. मात्र काही चित्रपटांनी त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्याच प्रसिद्ध गाजलेल्या चित्रपटांची माहिती आपण घेणार आहोत.
लगान – आशुतोष गोवारीकर यांच्या यशात मैलाचा दगड ठरलेला चित्रपट म्हणजे ‘लगान’. आमिर खानच्या भूमिकेने या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘लगान’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटाचा पुरस्कार सुद्धा मिळाला होता. चित्रपटातील पात्रे, लेखन, संवाद सगळ्याच बाबतीत प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटाने त्या वर्षीचा सर्वात यशस्वी चित्रपट होण्याचा देखील मान मिळवला होता.
स्वदेस– आशुतोष गोवारीकर यांच्या गाजलेल्या आणि दर्जेदार चित्रपटात ‘स्वदेस’ चित्रपटाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानने प्रमुख भूमिका साकारली होती. मोहन भार्गवच्या भूमिकेत असलेल्या शाहरुख खानच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथा लेखनसुद्धा आशुतोष गोवारीकर यांनी केले होते. चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा देखील पुरस्कार मिळाला होता.
जोधा अकबर – ऐतिहासिक कथा असलेल्या ‘जोधा अकबर’ चित्रपटाचे आजही कौतुक केले जाते. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले होते. चित्रपटातील हृतिक रोशनच्या अकबरच्या भूमिकेने सर्वांना मोहित केले होते. त्याचसोबत अभिनेत्री ऐश्वर्याने जोधाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कॅटरिनाचा मोठा गौप्यस्फोट! पार्टनरचा फोन करायची चेक, दिवाळी पार्टीत पब्लिक बाथरूममध्ये फोडलेला हंबरडा
‘खिलाडी’ अक्षय कुमारकडून भारताचा अपमान! वकिलाने थेट गृह मंत्रालयाकडे केली तक्रार