बॉलिवूडच्या दुनियेत खणखणीत वाजणारं मराठमोळं नाणं म्हणजेच कोल्हापुरचे ‘आशुतोष गोवारिकर’, जाणून घ्या त्यांचा सिनेप्रवास

आशुतोष गोवारीकर हिंदी सिनेसृष्टीतील एक मराठमोळं अतिशय प्रसिद्ध नाव. भरमसाठ सिनेमे न करता अतिशय मोजक्या मात्र दर्जेदार कलाकृती देणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे आशुतोष गोवारिकर. गोवारीकर यांचा बुधनारी (दि. 15 फेब्रुवारी) रोजी 58 वा वाढदिवस होता

आशुतोष गोवारिकर यांचा जन्म दिनांक 15 फेब्रुवारी 1964 रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरात झाला. एका लहान शहरातून आलेल्या आशुतोष यांनी त्यांच्या चित्रपटांमुळे संपूर्ण जगाला त्यांची दखल घ्यायला भाग पाडले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जाणून घेऊया त्यांचा आतापर्यंतचा सिनेप्रवास.

अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आशुतोष यांनी मुंबई गाठले. चित्रपटांमध्ये त्यांना सहजासहजी काम मिळाले नाही. म्हणून त्यांनी सुरुवातीला सर्कस, भारत एक खोज यांसारख्या दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये काम केले. त्याचसोबत काही काळ त्यांनी CID मध्येही काम केले.

सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक सिनेमांमधून नकारात्मक भूमिका देखील साकारली होती. त्यांची मोठ्या पडद्यावर अभिनेता एन्ट्री झाली ती 1984 साली आलेल्या ‘होली’ या चित्रपटातून. या सिनेमात त्यांनी आमिर खानसोबत काम केले. या सोबतच परेश रावल, नसिरुद्दीन शाह, श्रीराम लागू, दीप्ती नवल, ओम पुरी यांसारखी तगडी स्टारकास्ट होती.

या इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून प्रवेश केला मात्र त्यांच्या नशिबाने त्यांना दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसवले. आशुतोष यांनी त्यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले. भव्य दिव्य सिनेमे ही त्यांची दुसरी ओळख आहे.

Photo Courtesy : Ashutosh Gowariker twitter
Photo Courtesy : Ashutosh Gowariker twitter

आशुतोष गोवारिकर यांनी  2001 साली ‘लगान’ हा ब्लॉकबस्टर सिनेमे दिग्दर्शित केला. या सिनेमात आमिर खान आणि ग्रेसी सिंग मुख्य भूमिकेत होते. 2002साली हा सिनेमा उत्कृष्ट परदेशी भाषा या विभागात नामांकित झाला. या सिनेमात भरपूर इंग्रजी कलाकार होते. त्यांच्यासाठी स्वतः आशुतोष यांनी संवाद लिहिले होते. पण दुर्दैवाने हा सिनेमा ऑस्करमधून बाहेर पडला. मात्र या सिनेमाने त्यावर्षी 8 फिल्मफेयर पुरस्कारांवर नाव कोरले.

लगान चित्रपटातनंतर आशुतोष यांनी अतिशय वेगळ्या विषयावर आणि सर्वोत्कृष्ट सिनेमा बनवला स्वदेश. या सिनेमात शाहरुख खान मुख्य भूमिकेत होती. 2004 साली आलेला हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट सिनेमा ठरला. हा सिनेमा ग्लॅमर आणि बॉलीवूडच्या टिपिकल सिनेमांप्रमाणे नव्हता, तरीही चित्रपटाची कथा दमदार होती. हा सिनेमा आशुतोष यांच्या आणि शाहरुखच्याही करियरमधला उत्तम सिनेमा आहे.

जोधा अकबर….

या सिनेमात मुगल सम्राट जलाल-उद-दीन मुहम्मद अकबर आणि राजपूत राजकुमारी जोधाबाई यांच्यातले नाते अतिशय सुंदर मात्र तितक्यच रंजक पद्धतीने दाखवण्यात आले आहे. ऋतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांनी साकारलेल्या मुख्य भूमिका आणि या सिनेमातील भव्य सेट आजही प्रेक्षकांच्या आकर्षणाचा बिंदू ठरतात. ह्या चित्रपटाने साओ पाउलो इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वश्रेष्ठ परदेशी भाषा विभागात पुरस्कार मिळवला होती.

या सोबतच त्यांनी पानिपत, व्हॉट्स युअर राशी, खेलेंगे हम जी जान से, मोहंजोदाडो आदी सिनेमे देखील दिग्दर्शित केले. 2016 साली आलेल्या ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका देखील साकारली होती. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये अनेक पुरस्कांवर आपले नाव कोरले.

आशुतोष गोवारिकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक देव मुखर्जी यांच्या मुलीसोबत सुनितासोबत लग्न केले असून, त्यांना कोणार्क आणि विश्वांग ही दोन मुलं आहेत.(ashutosh gowariker bollywood actor director birthday special)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कॅटरिनाचा मोठा गौप्यस्फोट! पार्टनरचा फोन करायची चेक, दिवाळी पार्टीत पब्लिक बाथरूममध्ये फोडलेला हंबरडा
‘खिलाडी’ अक्षय कुमारकडून भारताचा अपमान! वकिलाने थेट गृह मंत्रालयाकडे केली तक्रार