‘अग्गंबाई सासूबाई’ या मराठी मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते. मालिकेच्या कथेला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली. त्याप्रमाणेच यातील कलाकारांना देखील बरीच लोकप्रियता मिळाली. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला, तरीही यातील पात्रं प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. यातील बबड्याची व्यक्तीरेखा तर खूप गाजली. बबड्या अर्थातच अभिनेता आशुतोष पत्कीला अपार लोकप्रियता मिळाली.
आशुतोष सोशल मिडियावर देखील बऱ्यापैकी सक्रीय असतो. नुकताच त्याने त्याचा जिममधला एक फोटो शेअर केला आहे. यात अभिनेत्याचा फिट ऍंड फाईन लूक पाहायला मिळाला आहे. तुम्ही पाहू शकता की, अभिनेता जिममध्ये बसला आहे आणि त्याने मिरर सेल्फी क्लीक केला आहे.
हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “तंदुरुस्त राहणे हे तुमचे लक्ष्य बनवू नका. शिस्तबद्ध होणे हे लक्ष्य ठेवा आणि तंदुरुस्त रहा.” चाहत्यांना आशुतोषचा हा अंदाज चांगलाच आवडल्याचे दिसून येत आहे. कारण अगदी काही तासातच यावर ३ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.
आशुतोष पत्कीबद्दल बोलायचे झाले, तर तो ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. त्याने या अगोदर बऱ्याच मालिकेमध्ये काम केले आहे, मात्र त्याला खरी ओळख ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेने मिळवून दिली. आशुतोष ‘मधु इथे चंद्र तिथे’, ‘मेंदीच्या पानावर’, ‘दुर्वा’ या मालिकेत दिसला आहे. तसेच ‘वन्स मोअर’ या चित्रपटातून त्याने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ
-कंगना रणौत करणार इंदिरा गांधींवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन; म्हणाली, ‘माझ्यापेक्षा इतर कोणीही…’