सुरेश रैनाला बॉलिवूड कलाकार आवडत नाहीत? आपल्या बायोपिकसाठी या दोन साऊथ कलाकारांची सुचवली त्याने नावे


चित्रपट म्हणजे फक्त अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यावर आधारित एखादी प्रेमकथा असण्याचा काळ गेला. मागील काही वर्षांपासून हिंदी सिनेसृष्टीमधे अनेक वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. काही सिनेमे तर पठडीबाहेरील असूनही प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. सत्य घटनांवर आधारित, महिला प्रधान, खेळांवर आधारित आदी अनेक विषय सिनेमांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. यासर्वांमधे अतिशय गाजणारा आणि भाव खाऊन जाणारा विषय म्हणजे बायोपिक. बायोपिकमधून समाजातील दिग्गज लोकांचे जीवन पडद्यावर साकारून प्रेक्षकांना त्यांच्याबद्दल माहिती दिली जाते. मागील काही काळापासून बॉलिवूडमध्ये अनेक मोठमोठ्या लोकांवर आधारित बायोपिक प्रेक्षकांसमोर आल्या. येणाऱ्या काळातही अनेक बायोपिक आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

क्रिकेटवर आधारित देखील अनेक खेळाडूंच्या बायोपिक आपण पाहिल्या आहेत. आपल्या इंडियन टीममध्ये अनेक महान खेळाडू होऊन गेले. त्यांच्यापैकी एक खेळाडू म्हणजे सुरेश रैना. सुरेशने जरी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी त्याची क्रेझ अजूनही जशी होती तशी आहे. आयपीएल खेळणारा सुरेश सध्या त्याच्या पुस्तकामुळे चांगला चर्चेत आला आहे. सुरेशने नुकतेच त्याचे Believe : What Life and Cricket Taught Me नावाचे पुस्तक बाजारात आणले आहे. या पुस्स्तकात सुरेशने त्याचे जीवन, क्रिकेट आणि त्याच्या जीवनातील चढ उतारांवर भाष्य केले आहे.

सुरेश सध्या त्याच्या या पुस्तकांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या निमित्ताने त्याने इंस्टाग्रामवर एक लाइव्ह सेशन घेतले. या सेशन दरम्यान सुरेशने अनेक विषयांवर मनमोकळा संवाद साधला. यावेळेस त्याने त्याच्या बायोपिकवर देखील त्याचे मत सांगितले. यावेळी तो म्हणाला, “जर माझ्यावर बायोपिक तयार झाली तर, माझी भूमिका दोन दाक्षिणात्य कलाकारांनी करावी अशी माझी इच्छा आहे. कारण साऊथ कलाकारांनी माझी भूमिका केली, तर ते माझे चेन्नईसोबत असलेले कनेक्शन खूप चांगल्या पद्धतीने समजू शकतात. सोबतच यात असा कलाकार असावा जो देशासाठी आणि चेन्नईसाठी खेळताना माझ्या मनात येणारी भावना जशीच्या तशी लोकांसमोर आणू शकेल. माझ्या मते सूर्या आणि दुलकर सलमान माझी भूमिका चांगली करू शकतील.” सुरेश आणि चेन्नईचे विशेष नाते आहे. सुरेश मागच्या काही वर्षांपासून आयपीएल दरम्यान चेन्नईच्या टीमकडून खेळतो.

सुरेशने त्याच्या बायोपिकसाठी साऊथ कलाकारांची नावे घेतल्याने बॉलिवूडचे चाहते नाराज झाले आहेत. आता त्यांच्याकडून सुरेशला अनेक प्रश्न विचारले जात आहे. सुरेशने बॉलिवूडच्या कलाकारांची नावे का नाही घेतली? सुरेशला बॉलिवूडमधले कलाकार आवडत नाही का?

सुरेशवर बायोपिक झाली तर त्यात नक्की कोणता कलाकार त्याची भूमिका साकारणार हे येणारा काळच ठरवेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फ्लॉप ऍक्टर ठरूनही रॉयल जीवन जगतोय अभिनेता आफताब; तर वयाच्या ३८व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकला लग्नगाठीत

-केरळ हायकोर्टाकडून चित्रपट निर्माती आयशा सुल्तानाला अटकपूर्व जामीन मंजूर; भाजप नेत्याविरुद्ध केले होते वक्तव्य

-कपूर घराण्याचे नियम तोडत करिश्माने केले होते अभिनयात पदार्पण; वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी


Leave A Reply

Your email address will not be published.