मूर्ती लहान पण कीर्ती महान! वयाच्या चौथ्या वर्षी बनला होता ‘डीजे’, पाहा व्हायरल होणारा आर्चचा व्हिडिओ

At The Age of 4 DJ Arch Makes Everyone Go Around People Shocked To See His Music Video


जवळपास सर्वांनाच संगीताची आवड असते. लहानपणापासूनच संगीतकार बनण्याचे अनेकजण स्वप्न पाहत असतात. परंतु असे कधी ऐकले आहे का, एक मुलगा ४ वर्षांच्या वयातच डीजे बनला आहे. कदाचित अनेकांना याबाबत माहिती नसेल, परंतु हे खरं आहे. तो मुलगा इतर कोणी नसून ‘डीजे आर्च ज्युनियर’ आहे. त्याला पाहून तुम्हीही ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ असंच म्हणाल. तो आपल्या जबरदस्त कौशल्याने समोरच्याला नाचण्यास भाग पाडतो. त्याचे व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. हे पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

माध्यमातील वृत्तानुसार, आर्चने वयाच्या तिसऱ्या वर्षी ‘साऊथ आफ्रिका गॉट टॅलेंट’चे सहावे हंगाम जिंकले होते. या शोमध्ये त्याने आपले डीजे कौशल्या दाखवून सर्वांची मने जिंकली होती. त्याला जगातील सर्वात लहान डीजे होण्याचा सन्मानही मिळाला आहे.

याव्यतिरिक्त त्याने गिनीझ वर्ल्ड रेकॉर्डही आपल्या नावावर केला आहे. तो जगातील अशी कोणतीही स्पर्धा जिंकणारा सर्वात लहान वयाचा स्पर्धक आहे.

जेव्हा तो अवघ्या २ वर्षांचा होता, तेव्हाच त्याच्या आई- वडिलांना त्याच्यातील प्रतिभेबद्दल समजले होते. त्याच्या पालकांना वाटले की, त्यामध्ये स्टेज परफॉर्मन्स करण्याची जबरदस्त प्रतिभा आहे. तो आपली प्रतिभा दाखवण्यासाठी अमेरिकेलाही गेला होता. तेथील जज त्याची प्रतिभा पाहून दंग झाले होते. त्यावेळी सायमनच्या चेहऱ्यावरील आनंद काही केल्या जात नव्हता.

मेल बी यांनी डीजे आर्चला सांगितले की, त्याला संगीताच्या लय- तालबद्दल चांगली समज आहे. दुसरीकडे हेडीने म्हटले होते की, ‘तू ६ वर्षे वय असलेला सर्वात कूल व्यक्ती आहेस.’ शो संपल्यानंतर माझ्याशी चर्चा कर, असे सायमनने डीजे आर्चला म्हटले होते, परंतु त्याला चाहत्यांकडून हवे तितके मत मिळाले नाहीत आणि तो स्पर्धेच्या पुढील राऊंडमधूनच बाहेर झाला होता.

त्यानंतर डीजे आर्च आपल्यातील प्रतिभा दाखवण्यासाठी ‘ब्रिटन गॉट टॅलेंट’मध्ये गेला. त्यावेळी ७ वर्षी आर्चला किताब जिंकता आला नाही, परंतु तो सर्वांच्या मनावर आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झाला. शोमध्ये जबरदस्त मनोरंजन आणि आनंद परवण्यासाठी त्याची खूप प्रशंसा करण्यात आली. यावेळी तो दुसऱ्यांदा सायमनसमोर परफॉर्मन्स करत होता. त्याने आपले दोन गाणेही रिलीझ केले आहेत. त्यात ‘मॉन्स्टर्स’ आणि ‘मेमरीज’ यांचा समावेश आहे. हे गाणे यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आले होते. तो जगासमोर आपली प्रतिभा दाखवण्यासाठी आतुर आहे.

तो सध्या ८ वर्षांचा आहे. इतक्या कमी वयातही त्याने आपल्या प्रतिभेने सर्वांना वेड लावले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.