बजरंगी भाईजाच्या मुन्नीने पुन्हा वेधले चाहत्यांचे लक्ष, डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल!!


सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातील मुन्नी तुमच्या लक्षात असेलच. सलमानशिवाय या छोट्या अभिनेत्रीनेही चित्रपटात प्रेक्षकांचे बरेच लक्ष वेधून घेतले होते. तिच्या गोंडस चेहर्‍याने आणि सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले होते. तर मंडळी, आम्ही बोलत आहोत आपली मुन्नी अर्थात हर्षाली मल्होत्राबद्दल.

आजकाल हर्षालीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हर्षालीने ‘उर्वशी’ या गाण्यावर मस्त डान्स केला आहे.

सध्या हर्षालीचे वय 12 वर्षे आहे. हर्षालीने हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. आतापर्यंत हा व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिला आहे. डान्स व्हिडिओमध्ये तिने अनेक बॉलिवूड सेलेब्सला टॅगही केले आहे. ‘बजरंगी भाईजान’ची ‘मुन्नी’ म्हणजेच हर्षाली मल्होत्राचा हा थ्रोबॅक डान्स व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटानंतर हर्षाली ‘मुन्नी’ नावाने ओळखली जाऊ लागली. त्यावेळी मुन्नीच्या भूमिकेमुळे तिला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटानंतर हर्षालीची क्यूटनेस इंटरनेटवरही पसरली. या चित्रपटानंतर तिने अर्जुन रामपालसोबत ‘नास्तिक’ चित्रपटामध्ये काम केले.

हर्षालीने टीव्ही करिअरची सुरुवात टीव्ही कमर्शियलमधून केली. याशिवाय हर्षाली झी टीव्ही आणि लाइफ ओकेवरील शोमध्येही दिसली आहे. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या शाहिदा पात्रासाठी सुमारे 1000 मुलींनी ऑडिशन दिल्या होत्या, त्यामध्ये हर्षालीची निवड झाली. हर्षालीचे इन्स्टाग्रामवर 4 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. चित्रपट स्टार असण्याव्यतिरिक्त ती एक सोशल मीडिया स्टारदेखील बनली आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.