बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केएल राहुल यांच्यातील नात्याची चर्चा नेहमीच होत असते. दोघांचे चाहते देखील याबद्दल खूप जागरूक असतात आणि त्यांच्याबद्दल येणाऱ्या प्रत्येक माहितीवर लक्ष ठेवतात. अलीकडेच असे काही घडले ज्यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला. अथिया शेट्टीने त्याला सोशल मीडियावर फेसटाईम कॉल करण्याचे सुचवले. केएल राहुलने यावर खूप मजेदार आणि मनोरंजक उत्तर दिले आहे.
या दोन सेलिब्रिटींच्या नात्याबद्दल सतत माहिती समोर येत असते. मात्र, या दोघांनीही आतापर्यंत या प्रश्नाबाबत मौन पाळले आहे, पण वेळोवेळी, त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून, चाहत्यांना या नात्याबद्दल संकेत मिळत आहे की, दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. गुरुवारी (२३ सप्टेंबर) केएल राहुलच्या सोशल मीडिया पेजवर प्रश्नोत्तरांच सेशन घेतलं होतं. त्याने चाहत्यांना विचारले की, आजच्या दिवशी त्याने काय करावे.
आस्क मी सेशनमध्ये अथियाने विचारला हा प्रश्न
दरम्यान, त्याची कथित गर्लफ्रेंड अथियाने प्रतिक्रिया दिली की, त्याने तिला फेसटाईम कॉल करावा. त्याचवेळी राहुलनेही अथियाच्या या प्रतिक्रियेला अतिशय रोचक उत्तर दिले. केएल राहुलने लिहिले की, तू माझा फेसटाईम कॉल उचलत नाही. यादरम्यान त्याने दुःखी चेहऱ्याचा एक फोटो शेअर केला आहे.
राहुलने पोस्टमध्ये शेअर केला फोटो
अथियाने लिहिले की, “यू शुड डेफ्स फेसटाईम मी.” राहुलने कॅमेऱ्याकडे पाहताना मांजरीच्या पोशाखात एका माणसासोबत पोझ देतानाचा एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आणि लिहिले की, “जेव्हा तू माझा व्हिडिओ कॉल उचलत नाही, तेव्हा माझा चेहरा असा असतो.”

दोघांचेही अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
अथियाबद्दल बोलायचं झालं, तर तिने सन २०१५ मध्ये ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत सूरज पंचोली मुख्य भूमिकेत होता. यानंतर अथियाने ‘मोतीचूर चकनाचूर’, ‘नवाबजादे’, ‘मुबारका’ यांसारख्या मोजक्याच चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘रंग माझा वेगळा’ मालिकेने गाठला ५०० एपिसोड्सचा टप्पा, कलाकारांनी ‘अशा’प्रकारे साजरा केला खास क्षण
-ड्रग्ज प्रकरणी अभिनेता गौरव दीक्षितला मिळाला जामीन, पण कोर्टाने दिल्या ‘कडक’ सूचना