Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड याला काय अर्थ! केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाला मिळणाऱ्या भेटवस्तू फक्त अफवाच, मोठा खुलासा

याला काय अर्थ! केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाला मिळणाऱ्या भेटवस्तू फक्त अफवाच, मोठा खुलासा

बॉलवूडमधील ‘अण्णा’ म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी याची लाडकी लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाच्या गेल्या अनेक दिवसांपासून चार्चा सुरु होत्या शेवटी या जोडप्याने (दि, 23 जानेवारी) रोजी खंडाळामधील थाटामाटात लग्न सोहळा उरकला. यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटी आणि भारतीय क्रिकेटर खेळाडूंनी हजेरी लावली होती. सुनीलने मुलीचा लग्नसोहळा थाटामाटात करण्याची एकही संधी सोडली नाही. आता लग्न सोहळा एवढ्या थाटामाटत म्हणल्यावर, मित्रमंडळीकडून मिळणाऱ्या भेटवस्तुदेखिल तेवढ्याच खास होत्या. सलमान खान, जॅकी श्रॉफ, विराट कोहली, एमएस धोनी यांच्याकडून जोडप्याला महागड्या भेटवस्तू मिळाल्या. एका रिपोर्टमध्ये असेही म्हटले की, सुनीलने मुलीला मुंबईत 50 कोटींचा बंगलाही भेट म्हणून दिला. मात्र, या सर्व गोष्टी खोट्या असल्याचे ‘अण्णा’ने सांगितलं आहे.

नुकतंच अभिनेत्री आथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) हे जोडपं लग्नबंधनात अडकलं आहे. अशातच या जोडप्याला त्यांच्या मित्र मंडळीकडून माहागडे गिफ्ट मिळाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर तुफाव व्हायरल झाल्या होत्या. बक्षिसांची किंमीदेखिल डोळे फिरतील अशा सांगण्यात आल्या होत्या मात्र, नुकतं सुनील शेट्टीने (Suneil Shetty) याने पसरणाऱ्या अफवावंर अधकृत विधान केलं आहे. त्याने सागंतले की, “बातम्यांमध्ये झळकणाऱ्या बातम्या आधारहीन आहेत. त्यात कोणतीही सत्यता नाहीये. आम्ही पत्रकार बांधवांना सार्वजनिक डोमेनमध्ये अशी चुकीची माहिती प्रकाशित करण्यापूर्वी आमच्याकडून त्याची पुष्टा करावी, अशी विनंती करतो.”

राहुल आणि अथियाला लग्नात अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्याची जोरदार चर्चा झाली होती. त्यात वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होता. वृत्तांमध्ये सांगण्यात आले होते की, विराट कोहलीने (Virat Kohli) आणि एमएस धोनी (MS Dhoni) आपल्या सहकारी खेळाडूला लग्नानंतर महागड्या भेटवस्तू दिल्या. विराटने त्याच्या मित्रासाठी 2.17 कोटींची एक बीएमडबल्यू कार भेट म्हणून दिली. विराटप्रमाणे धोनीही लग्नात उपस्थिती नव्हता, पण त्याने कावासाकी निंजा बाईक राहुलला भेट दिली. या बाइकची किंमत 80 लाख रुपये आहे, अथियाला बॉलिवूडमध्ये लाँच करणाऱ्या सलमान खान (Salman Khan) याने तिला 1.64 कोटी रुपयांची ऑडी कार भेट म्हणून दिली होती तर जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) याने 30 लाखाचं महागडं घड्याळ दिल्याचं सांगितलं होतं.

 

View this post on Instagram

 

सुनिल शेट्टीच्या विधानंतर दिल्या जाणाऱ्या भेटवस्तुंची यादी खोटी होती. केएल राहुल आणि आथ्या शेट्टी यांना कोणत्याच प्रकारचे गिफ्ट मिळालं नाही त्याशिवया त्यांच्या लग्न सोहळ्यात मोजक्याच पाहुणे मंडळीला आमंत्रित करण्यात आलं होतं. ज्यामध्ये काही बॉलिवूड कलाकार आणि क्रेकटरनी हजेरी लावली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘राजकारणापासून लांब राहा नाही तर…’ पठाण चित्रपाटाचं कौतुक करणाऱ्या बॉलिवूडवर कंगनाने व्यक्त केला संताप
मोठी बातमी! ज्युनिअर एनटीआरच्या जवळच्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका

हे देखील वाचा