Saturday, April 20, 2024

एमएस धोनीसोबतच्या नात्याला ‘कलंक’ मानते ‘ही’ दक्षिणात्य अभिनेत्री, श्रीशांतसोबतही जोडलं गेलंय नाव

दक्षिणात्य अभिनेत्री राय लक्ष्मी (Raai Laxmi) नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती सोशल मीडियावर सतत आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवताना दिसते. तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते असले, तरी एकेकाळी महेंद्रसिंग धोनीसाठी (Mahendra Singh Dhoni) तिचे हृदय धडधडायचे. माहीने कधीही रायला त्याची गर्लफ्रेंड म्हणून जाहीरपणे स्वीकारले नाही. परंतु राय लक्ष्मीने अनेकवेळा मुलाखतींमध्ये ही गोष्ट सांगितली आहे.

लग्नापूर्वी धोनीचे नाव जुली फेम या अभिनेत्रीसोबत जोडले गेले होते. २००८-२००९ च्या सुमारास माही आणि राय लक्ष्मी यांच्या डेटिंगच्या बातम्यांनी खूप वेग धरला होता आणि दोघेही अनेकदा एकत्र दिसले होते. (when raai laxmi said my relationship with dhonii like a stain or a scar)

राय लक्ष्मीने २०१४ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत धोनीसोबतच्या ब्रेकअपबद्दल सांगितले होते की, “मला विश्वास वाटू लागला आहे की, धोनीसोबतचे माझे नाते एका डाग किंवा एखादी खून असल्याप्रमाणे आहे जे जास्त लांब जात नाही.”

अभिनेत्रीने असेही सांगितले आहे की, ती धोनीशिवाय इतर कोणासाठीही इतकी रोमँटिक भावना आणू शकली नाही. रायचे नाव माजी क्रिकेटपटू श्रीशांतसोबतही जोडले गेल्याची माहिती आहे. श्रीसंतने लिंक-अप नाकारले असले तरी, त्याने राय लक्ष्मीला तिच्या चित्रपटांच्या सेटवर भेटल्याचे कबूल केले होते.

राय म्हणते की, ब्रेकअप सौहार्दपूर्ण होते आणि त्यांना अजूनही एकमेकांबद्दल आदर आहे. ती स्वतःला खूप आनंदी व्यक्ती मानते आणि तिच्या कामाला प्राधान्य देते.

राय लक्ष्मीचा जन्म ५ मे १९८९ रोजी कर्नाटकात झाला. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘करका कसादरा’ या तमिळ चित्रपटातून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच वर्षी तिचे ४ चित्रपट प्रदर्शित झाले. ज्यामध्ये तमिळ व्यतिरिक्त तेलुगू आणि कन्नड चित्रपटांचाही समावेश होता. यानंतर राय लक्ष्मीने अनेक तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांचा भाग बनून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अकिरा’ चित्रपटात राय लक्ष्मी मायाच्या भूमिकेत दिसली होती. यानंतर ती हिंदी चित्रपटसृष्टीत ‘जुली २’ आणि ‘ऑफिसर अर्जुन सिंग आयपीएस बॅच २०००’ या चित्रपटांमध्येही दिसली.

जर आपण राय लक्ष्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोललो, तर ती या दिवसांत कन्नड चित्रपट ‘झांसी आयपीएस’, तेलुगु चित्रपट ‘आनंदा भैरवी’ आणि ‘गँगस्टर २१’ मध्ये दिसणार आहे. ही अभिनेत्री तमिळ आणि मल्याळम सक्रिय असते.

हेही वाचा :

हे देखील वाचा