Monday, March 4, 2024

वरुण धवन आणि एटलीच्या आगामी चित्रपटाचं नाव जाहीर, रिलीज डेटबद्दलही केला खुलासा

‘जवान’ चित्रपटाचा दिग्दर्शक एटलीने नुकतेच वरुण धवनसोबत काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.परंतू त्यांनी हेदेखील स्पष्ट केले आहे की, या चित्रपटात ते दिग्दर्शक म्हणुन दिसणार नाहीत. हिट तमिळ निर्मात्याने खुलासा केला आहे की,तो त्याच्या नवीन चित्रपटाची निर्मीती करणार आहे. हा चित्रपट एटलीचा(Atlee) हीट चित्रपट ‘थेरी’चा(theri) रिमेक असेल.या चित्रपटाला ‘वीडी 18 ‘च्या (VD 18) रुपात डब केले असुन. नुकतेच शुटींगसाठीची पुजादेखील झाली आहे.त्याचसोबत मुहुर्त शाॅट देखील केला गेला आहे. चाहते या चित्रपटाच्या शीर्षकाची आतुरतेने वाट पाहात आहेत . अशातंच फिल्मच्या नावाविषयी एक मोठा अपडेट समोर येत आहे. त्यासोबतंच चित्रपटाच्या नावाविषयीदेखील मोठा दावा केला जात आहे.

वीडी 18 चं शीर्षक आलं समोर
वरुण धवन (varun dhawan)अभिनित थेरी चित्रपटाचा रिमेक लवकरंच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुराद खेतानी आणि एटलीने या चित्रपटाची निर्मिती केली असुन चित्रपटाचं नाव ‘बेबी जाॅन ‘ (baby john) आहे. याची घेषणा लवकरंच केली जाणार आहे. रिपोर्टनुसार याची ऑफिशिअल घोषणा 27 किंवा 29 जानेवारीला केली जाईल. हा अनाउंसमेंट वीडियो 54 सेकंदाचा असेल आणि फिल्म 31 मे 2024 ला रिलीज होईल. एटलीने काल एक अनाउंसमेंट वीडियो शेअर केला,ज्यात मुहूर्त शाॅटची झलक पाहायला मिळाली. त्यांनी याचाही खुलासा केला आहे की वामिका गब्बी (Wamiqa gabbi) आणि किर्ती सुरेश (keerthy suresh)चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसणार आहेत.

लवकरंच मिळणार आनंदवार्ता
अनाउंसमेंट वीडियो शेअर करताना एटलीने लिहीले,” कृपया या प्रोजेक्टला तुमचा आशिर्वाद आणि सदिच्छा द्या, हे आमच्या हृदयाच्या खुप जवळ आहे. रोमांचक बातमी लवकरंच येत आहे. ” एटलीसोबतंच फिल्मच्या निर्मितीमध्ये मुराद खेतानी, प्रिया एटली आणि ज्योती देशपांडे यांचाही समावेश आहे. हा प्रोजेक्ट जिवो स्टुडीयो ,ए फाॅर ऍपल स्टुडीयो आणि सिने 1 स्टुडीयो यांच्या सहविद्यमाने हा चित्रपट प्रस्तुत केला जाणार आहे.

‘वीडी 18 ‘साठी वरुण धवन उत्सुक
एटलीच्या या आगामी चित्रपटात वरुण धवन आणि वामिका गब्बीसोबतंच कीर्ति सुरेश, जॅकी श्राॅफ( jackie shroff) आणि राजपाल यादव (Rajpal yadav)देखील दिसणार आहेत. चित्रपटाविषयी बोलताना वरुण धवन म्हणाला की, ” मी फक्त इतकंच सांगु शकतो की,हा चित्रपट एक मास-ऍक्शन एंटरटेनर आहे, आणि यात खुप मनेरंजन आहे,ज्याची मलाही आवड आहे. आणि यासाठी मी माझं बेस्ट देणार आहे. ” ही एक ऍक्शन एंटरटेनर फिल्म आपल्या मनोरंजक कथेने, जबरदस्त प्रदर्शनाने आणि हाय-ऑक्टेन ऍक्शन दृश्यांनी सिनेप्रेमींना मंत्रमुग्द करणार आहे.

हेही वाचा- VD 18 च्या शुटींग दरम्यान वरुन धवनला मोठी दुखाापत 

हे देखील वाचा