Saturday, July 6, 2024

अर्रर्र! ‘अतरंगी रे’चा ट्रेलर शेअर करताना अक्षय कुमारकडून झाली मोठी चूक, नेटकऱ्यांनी खेचले पाय

सोशल मीडिया हे सामान्य व्यक्तींपासून ते मोठ-मोठ्या कलाकारांपर्यंत सर्वांसाठीच महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे, सध्याच्या काळात कलाकार या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी जोडलेले असतात. यावर वावरत असताना प्रत्येकालाच भान ठेवून गोष्टी शेअर कराव्या लागतात. मात्र, अनेकदा कलाकारांकडूनही चुका होतात, ज्यामुळे त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना आपण पाहतो. आता असेच काहीसे सुपरस्टार अक्षय कुमारसोबत घडले आहे. अक्षयने एक मोठी चूक केली आहे. त्यामुळे नेटकरी प्रतिक्रियांचा पाऊस पाडत आहेत.

अक्षय कुमार आनंद एल राय यांच्या बहुप्रतिक्षित ‘अतरंगी रे’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सध्या या चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. ‘अतरंगी रे’चा ट्रेलर त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करताना अक्षय कुमारने मोठी चूक केली आहे. अक्षयची ही चूक चाहत्यांपासूनही लपलेली नाही. या चुकीसाठी आता नेटकरी अक्षयचे पाय खेचत आहेत. (Atrangi Re Netizens Pulls Akshay Kumars Legs As He Forgot To Tag Dhanush While Posting The Trailer On Twitter)

अक्षय कुमारकडून झाली ‘ही’ चूक
अक्षय कुमारने ट्विटरवर ‘अतरंगी रे’चा ट्रेलर शेअर केला आहे. अक्षयला ही पोस्ट शेअर केल्यानंतर काही मिनिटांत डिलीट करावी लागली. खरं तर, हा ट्रेलर पोस्ट करताना त्याने चित्रपटाशी संबंधित सर्व लोकांना टॅग केले. घाईघाईत अक्षय कुमार चित्रपटातील दुसरा हिरो धनुषला टॅग करायला विसरला. अक्षयला त्याची चूक कळली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अक्षयच्या चाहत्यांना त्याच्यासोबत काय झालंय याची कल्पना होती. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “जुने ट्वीट डिलीट का केले?”

‘अतरंगी रे’चा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक अक्षय कुमारचे खूप कौतुक करत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमारची एन्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे. दुसरीकडे मात्र काही लोकांनी अक्षय कुमारचा पाय ओढायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले की, ‘अक्षय पाजी तुम्ही अशी चूक कशी करू शकता?’

चित्रपटासाठी उत्सुक आहेत प्रेक्षक
‘अतरंगी रे’चा ट्रेलर प्रेक्षकांना आवडला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवर प्रेक्षकांच्या सतत प्रतिक्रिया येत आहेत. हा चित्रपट २४ डिसेंबर, २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष यांचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट तुम्ही OTT प्लॅटफॉर्म Disney Hotstar वर पाहू शकता.

अक्षयबद्दल बोलायचं झालं, तर तो शेवटचा, ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात झळकला होता. त्याच्या या चित्रपटाने तुफान कमाई केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-किसिंग सीनमध्ये लारा दत्ताला नाही कोणतीही अडचण, सांगितली कशी होती पती महेश भूपतीची प्रतिक्रिया

-अतरंगी कथा असणाऱ्या आणि प्रेमाचा त्रिकोण दाखवणाऱ्या ‘अतरंगी रे’ सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीझ

-हाय गर्मी! मोनालिसाने मिनी स्कर्ट घालून केला जबरदस्त डान्स, ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा

हे देखील वाचा