Saturday, March 2, 2024

बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्याचा घटस्फोट?, पत्नीने शेअर केलेल्या पोस्टवरून लावला जातोय अंदाज

‘जाने तू या जाने ना’ फेम अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इमरान खान मागील बराच काळ झाला बॉलिवूडपासून चित्रपटांपासून लांब आहे. मात्र तो मध्ये मध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. इमरान खानने बॉलिवूडमध्ये मोठ्या दणक्यात पदार्पण केले, मात्र तो त्याला मिळालेले यश टिकवू शकला नाही, आणि तो इथून गायब झाला. त्याने त्याची मैत्रीण असलेल्या अवंतिका मलिकसोबत लग्न केले होते. मात्र २०१९ पासून त्यांच्या लग्नात देखील समस्या निर्माण झाल्या आहेत. दोघेही घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या येत असतात. मात्र अजूनपर्यंत दोघांकडून देखील यार काहीच माहिती आलेली नाही.

असे असले तरी अवंतिका मलिकच्या सोशल मीडिया पोस्ट सतत तिच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टींकडे इशारा करताना दिसतात. ती अप्रत्यक्षरीत्या तिच्या पोस्ट शेअर करत असते. आता पुन्हा एकदा इमरान आणि ती तिच्या पोस्टमुळेच चर्चेत आले आहे. तिने जी पोस्ट शेअर केली त्यावरुन आता सगळ्यांना हाच प्रश्न पडला आहे की, त्यांचा घटस्फोट झाला आहे की, नाही?

Imran-Khan
Photo Courtesy: Instagram/imrankhan

दरम्यान अवंतिका मलिकने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक माइली साइरस यांच्या गाण्यातील फोटो शेअर करत घटस्फोटाशी संबंधित गाण्याचे शब्द कॅप्शन म्हणून लिहिले आहे. तिने लिहिले, “घटस्फोट तिच्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे. फक्त तीच नाही…#फक्त सांगते” तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या घटस्फोटाबद्दल विचारले आहे.

तत्पूर्वी इमरान आणि अवंतिका यांनी २०११ साली लग्न केले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे. २०१९ साली ते वेगळे होत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. एका माहितीनुसार इमरान आणि अवंतिका यांच्या घटस्फोटाचे कारण म्हणजे इमरानचे फ्लॉप करियर आहे. कट्टी बट्टी सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर त्याच्याकडे येणाऱ्या ऑफर कमी झाल्या आणि नंतर बंदच झाल्या, त्याच्याकडे काम नसल्यामुळेच हा घटस्फोट होत असल्याचे सांगितले जात आहे. यातच इमरान खानला अभिनेत्री लेखा वाशिंगटनसोबत स्पॉट केले गेले होते. लेखाने ‘मटरू की बिजली का मंडोला’मध्ये काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
माधुरीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस; म्हणाली, “निस्वार्थी निखळ मुलांमध्ये…”

‘मैत्रीत जाणीव पाहिजे आणि…’ सुनील शेट्टीने सलमान आणि त्याच्या नात्यावर भाष्य

हे देखील वाचा