×

अविनाश नारकर यांनी पत्नी ऐश्वर्यासोबत ‘कच्चा बदाम’वर केला भन्नाट डान्स

सोशल मीडिया हे असे ठिकाण आहे जिथे प्रत्येक गोष्ट व्हायरल होत असते. एखादी गोष्टी व्हायरल होताच मग सोशल मीडियावर ती ट्रेंड होते. अगदी कलाकार देखील त्या गाण्यावर ताल धरतात. काही दिवसापासून सोशल मीडियावर ‘कच्चा बदाम’ हे गाणे चांगलेच ट्रेंड होत आहे. अनेकांनी या गाण्यावर ताल धरला आहे. अनेक कलाकारांनी देखील वेळात वेळ काढून ही ट्रेंड फॉलो केली आहे. अशातच मराठी अभिनेते अविनाश नारकर आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या नारकर यांनी या गाण्यावर ठेका धरला आहे त्यांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

अविनाश नारकर यांनी हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, अविनाश, ऐश्वर्या आणि अश्विनी केसकर या तिघे डान्स करत आहेत. त्या दोघींनी ही साडी नेसली आहे.हा व्हिडिओ शेअर करून त्याने कपशन दिले आहे की, “शेवटी मी आणि आश्र्विनीने ऐश्वर्याला बदाम विकायला लावलेच. कच्चा बदाम, पक्के खिलाडी.”

View this post on Instagram

A post shared by Avinash Narkar (@avinash.narkar)

त्याच्या चाहत्यांना त्यांचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओ वर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “कमाल आहात तुम्ही दोघेही.” तर दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, माझं ऐकलं की, बायकोची भीती.” अशाप्रकारे त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे दोघेही उत्तम कलाकार आहेत. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.

हेही वाचा :

Latest Post