×

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील जेसिका खऱ्या आयुष्यात आहे एका मुलाची आई, जाणून घ्या संपूर्ण माहिती

‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या जोरदार चर्चेत आहे. अनेक मालिकांनी मागे सारत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. नेहा-यश यांच्या प्रेमाने आणि निरागस परीच्या अभिनयाने सगळेच या मालिकेकडे ओढले जातात. मालिकेची कथा काहीशी वेगळी आणि लक्षवेधी आहे. त्यामुळे मालिकेच्या प्रोमोपासून कलाकार प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे मुख्य भूमिकेत आहेत. दोन्हीही कलाकारांनी खूप वर्षांनी टेलिव्हिजनवर पुनरागमन केले आहे. त्यामुळे त्यांचे चाहते देखील त्यांना प्रेम दर्शवत आहेत.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत आता एक रंजक वळण आले आहे. नेहाचे देखील यशवर प्रेम आहे. परंतु ती तिचे प्रेम मान्य करत नाहीये. त्याने यशचा मित्र समीर आता त्यांना दोघांना एकत्र आणण्यासाठी प्लॅन करत आहे. अशातच त्याने एक मोठा प्लॅन केला आहे. त्याने जेसिका नावाच्या एका नाव फॉरेन अभिनेत्रीला बोलावले आहे आणि आता तो ती यशची एक्स गर्लफ्रेंड आहे असे सगळ्यांना सांगत आहे. परंतु त्याने केलेला प्लॅन यशस्वी झाला आहे. त्याने असे केल्याने नेहाचा चांगलच जळफळाट होत आहे. (Information about Jessica in majhi tujhi reshimfagh serial)

परंतु आता सगळ्यांना प्रश्न पडला आहे की, मालिकेत आलेली जेसिका नक्की आहे तरी कोण? जेसिका ही रशियन अभिनेत्री आहे. तिचे नाव जेन कटारिया हे आहे. खऱ्या आयुष्यात ती एका मुलाची आहे. तिचा मुलगा देखील अनेकवेळा शूटिंगवर येत असतो. तिने याआधी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत देखील काम केले आहे. तिचा पती भारतात असल्याने ती देखील सध्या भारतातच राहते.

हेही वाचा :

Latest Post