महाराष्ट्राचा अभिमान अविनाश-विश्वजीत यांनी ‘मर्डर मिस्ट्री 2’ या नेटफ्लिक्स यूएसच्या अॅडम सँडलर आणि जेनिफर अॅनिस्टन अभिनीत चित्रपटासाठी द ग्रेट इंडियन वेडिंग साँग स्कोअर केला आहे. मराठी चित्रपसृष्टीत आपल्या मेलोडीयस गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अशा या कंपोजर जोडीने पुन्हा एकदा महाराष्ट्राचाच नव्हे, तर संपुर्ण भारताचा जगभरात गौरव केला आहे.
खरे तर, अविनाश-विश्वजीत यांनी त्यांचे फ्रेंच मित्र अविशाई, माहिना खानुम आणि चांदनीसोबत एक फ्रेंच शॉर्ट फिल्म आणि टीना टर्नर आणि सावनी शेंडे यांच्यासोबत एक स्वीडिश प्रोजेक्टही या आधी केला आहे. अशात आता, जेव्हा आरआरआर चित्रपटातील ‘नाटू – नाटू’साठी ऑस्कर पुरस्कार मिळाला, त्याच वेळी या महाराष्ट्राच्या वाघांनी Netflix USच्या चर्चेतील चित्रपटसाठी केलेल्या गाण्यानी हॉलिवूड ला बल्ले बल्ले करायला लावले.
जेरेमी गॅरेलिक यांनी ‘मर्डर मिस्ट्री 2’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे, ज्यांनी द ‘हँगओव्हर’ लिहिला आहे तसेच ‘दि ब्रेक’ अपचे दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. झोडियाक, द अमेझिंग स्पायडर-मॅन आणि त्याचा सिक्वेल, इंडिपेंडन्स डे: रिसर्जन्स यांसारख्या चित्रपटांच्या लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या जेम्स वॅन्डरबिल्टच्या पटकथेसह स्क्रीम आणि त्याचा सिक्वेल सह-लेखन आणि निर्मिती देखील केली आहे. ‘मर्डर मिस्ट्री 2’ या चित्रपटात अॅडम सँडलर आणि जेनिफर अॅनिस्टन हे नामवंत कलाकार आहेत. 31 मार्च रोजी नेटफिल्कस वर हा चित्रपट रिलीज होणार आहे.
अविनाश-विश्वजीत त्यांच्या दमदार संगीतासाठी ओळखले जातात. त्यांनी मराठी, कन्नड, तेलुगु आणि कोकणी चित्रपटांमध्ये 25 वर्षात 75 हून अधिक चित्रपटांसाठी गाणी तयार केली आहेत, त्यासाेबत त्यांनी पार्श्वसंगीत देखील दिले आहे. सक्रिय संगीतकार म्हणून, या जोडीचे वैयक्तिकरित्या आशा भोसले, सुरेश वाडकर, साधना सरगम आणि श्रेया घोषाल सारख्या गायकांसह हजारो स्टेज शो देखील केले आहेत. चित्रपट आणि टेलिव्हिजन निर्मिती, सर्जनशील निर्मिती, पटकथा लेखन, संकल्पना विकास आणि कथा निर्माण यांसारखी खास कामे देखील यांनी केली आहेत.
‘मर्डर मिस्ट्री 2’मध्ये फरहाद भिवंडीवाला यांच्या आवाजात व अविनाश-विश्वजीत रचीत ‘किंग दी वेडिंग’ या गाण्याने पॅरिस मधील स्पेशल स्क्रिनिंगमध्ये फक्त हॉलिवूडचा ॲक्टर्सनाच नाही, तर सबंध थिएटरला देखिल त्यांचा तालावर नाचवले. इथे अॅडम सँडलर आणि जेनिफर अॅनिस्टन देखील उपस्थित होते.
अविनाश-विश्वजित पॅरिसमध्ये 30 मार्चच्या प्रीव्ह्यूमध्ये सहभागी होणार आहेत.“आमच्या भारतीय संगीताला जागतिक स्तरावर मान्यता मिळणे हा एक सन्मान आणि विशेषाधिकार आहे. हिप-हॉप, ईडीएम किंवा इतर कोणत्याही संगीत शैलीशी जुळवून घेणे आम्हा भारतीयांसाठी सोपे आहे. ‘ किंग दी वेडिंग है’ हे गाणं आता हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत धुमाकूळ घालेल यात शंका नाही. ”
अविनाश-विश्वजीत यांची आतापर्यंतच्या मेलोडियस प्रवासाची झलक
अविनाश-विश्वजीत ही संगीत दिग्दर्शक जोडी गेल्या 12 वर्षांपासून सातत्याने हिट गाण्यांच्या निर्मितीसाठी ओळखली जाते!
अविनाश चंद्रचूड अभियंता असेल तरी त्यांना संगीतात प्रंचड आवड हाेती.निपुण पियानोवादक, संगीतकार, व्यवस्थाकार, प्रोग्रामर अशाप्रकारे गेल्या 25 वर्षांपासून ते संगीत क्षेत्रात सक्रिय आहेत.
विश्वजीत जोशी यांच्या विषयी बाेलायचे झाले, तर त्यांनी आयटी शिक्षणशास्त्रात पदवीधर शिक्षण घेतले. मात्र, सुरुवातीच्या काळात एक अभिनेता, दिग्दर्शक म्हणून थिएटर कार्यकर्त्याने संगीतकार, गीतकार, अरेंजर, प्रोग्रामर, ध्वनी अभियंता म्हणून त्यांनी आपला मार्ग शोधला असून गेल्या 25 वर्षांपासून ते संगीत क्षेत्रात सक्रिय आहेत.
आजपर्यंत या जोडीने महाराष्ट्रातील विविध प्रतिष्ठित कार्यक्रमांमध्ये “अविनाश-विश्वजीत लाइव्ह इन कॉन्सर्ट” शो सादर केले आहेत, ज्याने संगीत रसिकांचे अत्यंत समाधानापर्यंत मनोरंजन केले आहे.(Avinash-Vishwajit’s big bang in Hollywood! A modern wedding song composed for the film)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
गुढीपाडव्यानिमित्त प्रियाने नऊवारीमध्ये शेअर केले सुंदर फाेटाेशूट, एकदा पाहाच
‘मर्यादा’ याच गोष्टीमुळे शाहरुख आर्यन खान केसमध्ये होता शांत, त्याच्या मित्राने केला खुलासा