Sunday, January 18, 2026
Home बॉलीवूड अक्षय- आमिर नव्हे, तर ‘हा’ अभिनेता आयशा झुल्काला वाटतो सगळ्यात ‘हॅंडसम’; चकित करेल उत्तर

अक्षय- आमिर नव्हे, तर ‘हा’ अभिनेता आयशा झुल्काला वाटतो सगळ्यात ‘हॅंडसम’; चकित करेल उत्तर

आयशा झुल्का (Ayesha Jhulka) ९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. हिंदी इंडस्ट्रीमधील अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत तिने चित्रपटात काम केले आहे. अलीकडेच आयशाला तिच्या आवडत्या अभिनेत्याविषयी विचारले असता तिने चकित करणारे उत्तर दिले. 

आयशा झुल्काने आपल्या दमदार अभिनयाने ९०चा काळ चांगलाच गाजवला होता. आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर तिने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. अभिनेता सलमान खानसोबत (Salman Khan) तिने ‘कुर्बान’ चित्रपटात काम केले होते. ‘कुर्बान’ चित्रपटाच्या आधी आयशाने नागार्जुनसोबत (Nagarjuna) ‘नेती सिद्धार्थ’ या तेलुगू चित्रपटात काम केले होते. नुकताच आयशाने सलमान खानबाबत एक मोठे विधान केले आहे, ज्याची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री आयशा नुकतीच ‘सारेगमप’ या गाण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी कार्यक्रमाचा होस्ट आदित्य नारायणने (Aditya Narayan) आयशाला अनेक प्रश्न विचारले होते. यावेळी आदित्यने “सलमान खान, अजय देवगण, मिथुन चक्रवर्ती, आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्यात सगळ्यात खराब डान्स कोण करत असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी आयशाने पटकन सलमान खानचे नाव घेतले होते.

यावेळी बोलताना आयशा म्हणाली की, “मी सलमान खानसोबत ‘कुर्बान’ चित्रपटात पहिल्यांदा काम केले. त्यावेळी जय बोराडे हे आमचे नृत्यदिग्दर्शक होते. त्यावेळी सलमान खान त्यांना मी फक्त चालतो आणि आयशा डान्स करेल असे म्हणायचा. मात्र त्यावेळी डान्सला घाबरणारा सलमान खान आता खूप छान डान्स करतो, जो पाहून मी सुद्धा थक्क होते.” यावेळी आदित्यने आयशाला या पाच अभिनेत्यांमध्ये सर्वात सुंदर कोण आहे? असाही प्रश्न विचारला होता. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता तिने सलमान खानचे नाव घेतले होते. या कार्यक्रमात आयशाने तिच्या ‘पेहला नशा’ गाण्यावर बहारदार डान्ससुद्धा केला. ज्यावर सगळेच फिदा झाले होते.

अभिनेत्री आयशा झुल्काचा जन्म २८ जुलै १९७२ मध्ये झाला होता. तिने ‘कुर्बान’, ‘मीत मेरे मन के’ अशा प्रसिद्ध हिंदी चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा