Friday, April 10, 2026
Home बॉलीवूड ह्या चित्रपटामुळे ‘टार्जन गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झाली होती आयेशा टाकिया, तर लग्न झाल्यानंतर करिअरला दिला ब्रेक

 ह्या चित्रपटामुळे ‘टार्जन गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झाली होती आयेशा टाकिया, तर लग्न झाल्यानंतर करिअरला दिला ब्रेक 

चित्रपटसृष्टी मध्ये बरेच कलाकारानी क्षेत्रामध्ये पदार्पण करून नाव कमावले आहे, या क्षेत्रात मात्र काम करणे तसेच काम मिळवणे सोपे नाही. तर प्रत्येक नवीन कलाकारासाठी तिथे जागा मिळवणे म्हणजे एक आव्हान असते. बरेच लोक या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मुंबईमध्ये येतात आणि कष्ट करतात. त्यातील काही जणांना प्रसिद्धी मिळत असते. मात्र असेही काही कलाकार असतात ज्यांना प्रसिद्धी मिळाल्यानंतर ते हे करिअर सोडण्याचा निर्णय घेतात तर अशीच एक अभिनेत्री बाबत आम्ही सांगत आहोत ती म्हणजे सलमान खान आणि शाहिद कपूर सारख्या दिग्गज लोकांसोबत तिने काम करून नाव मिळवले. काही काळानंतर या क्षेत्रातून तिने काढता पाय घेतला.

तर अभिनेत्री म्हणजे आयेशा (aayesha)टाकिया आहे तर आज तिचा वाढदिवस आहे. आणि आज ती 40 वर्षाची झाली आहे. तर या अभिनेत्रीने 2004 मध्ये ‘टार्झन: द वंडर कार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आणि त्यानंतर ती ‘टार्झन गर्ल’ म्हणून ओळखली जाऊ लागली. तसेच तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर तिने ‘डोर’ आणि ‘वॉन्टेड’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तिने 2011 मध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्यावर आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभिनयातून निवृत्ती घेतली.

वॉन्टेड ब्लॉकबस्टर चित्रपटात तिने सलमान खान सोबत काम केले होते. वॉन्टेड प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच, 2009 मध्ये आयेशा टाकियाने लग्न केले. या अभिनेत्रीने वयाच्या 23 व्या वर्षी अभिनयातून निवृत्ती घेतली. तीने जरी आता अभिनयातून निवृत्ती घेतली असली तरी तीने साकारलेले अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

 

‘धुरंधर 2’ला प्रोपेगेंडा म्हणणाऱ्यांवर भडकले संदीप रेड्डी वांगा, ॲनिमलचे दिग्दर्शकांनी आदित्य धर यांचीही केली स्तुती

हे देखील वाचा