२२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे उदघाटन होणार आहे. याच निमित्ताने संपुर्ण देशभरात जोरदार तयारी सुरु आहे. याच निमित्ताने देशभरातुन अनेक मान्यावर अयोध्येत येत आहे. रामानंद सागरयांच्या रामायणया मालिकेतुन घराघरात पोहचलेले, रामाची भुमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल सुद्धा (Arun govil) अयोध्येत पोहचले. यावेळी नागरिकांनी पाया पडून त्यांचे स्वागत केले.
अभिनेते अरुण गोविल यांचा अयोध्या एअरपोर्टवरील एक व्हिडिओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात ते एअरपोर्टवर पोहोचतात लोकांनी त्यांच्या पाया पडून अभिवादन केले. अरुण गोविलयांनी इंस्टाग्राम पोस्ट करत ते अयोध्येत असल्याची माहीती दिली. व्हिडिओ शेअर करत अरुण गोविल यांनी कॅपशनमध्ये “राम नाम कर अमित प्रभावा, संत पुराण उपनिषद गावा… आज पहिल्यांदा विमानाने अयोध्येच्या मफर्षि वाल्मीकि एअरपोर्टवर आल्या नंतरचे दृश्य.. खुप सुंदर एअरपोर्ट आहे… जय श्री राम”
मकर संक्रांतीच्या दरम्यान अरुण गोविल अयोध्यात होते. यादरम्यान त्यांनी भंडार्यातील प्रसादाच्या खिचडीचा आस्वाद घेतला. व्हिडिओ शेअर करत त्यांनीही माहीती दिली. ‘प्रभु राम स्वता प्रसाद ग्रहण करत आहे’ अशी एका युझरनेया व्हिडिओवर कमेंट सुद्धा केली. तर एकाने आम्ही ‘तुमच्यातच रामाला पाहिलं आहे’. ‘आम्ही तुम्हाला पाहण्यासाठी खुप उत्साही आहोत’ अशी कमेंट केली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
प्रियांका आणि निकने समुद्रकिनारी केला लेकीचा वाढदिवस साजरा, मालतीच्या क्युटनेसने दुनिया झाली दिवानी
महाराष्ट्रात 1 मार्चला होणार ‘लग्न कल्लोळ’, चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित