Thursday, April 18, 2024

पन्नाशी उलटलेला सलमान खान त्याच्या ‘या ड्रिमगर्ल’च्या आठवणीत आहे अविवाहित, स्वतःच केला खुलासा

बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेता म्हणून आयुष्यमान खुराणा हा ओळखला जातो. नेहमीच प्रवाहाच्या पलीकडे जात तो चित्रपटांची निवड करतो, आणि त्याचे फॅन देखील त्याची ही निवड योग्य ठरवतात. सध्या आयुष्मानच्या आगामी ‘ड्रीम गर्ल 2’ ची जोरदार चर्चा आहे. अशातच या सिनेमाचे एक मस्त मजेशीर असा दुसरा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

आयुषमानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा नवीन टिझर प्रदर्शित केला आहे. या टीझरमध्ये एक स्त्री साडी नेसून फोनवर बोलत चालत येताना दिसते. दुसऱ्या बाजूला सलमान खान बोलत असल्याचे आपल्याला समजते. फोनवर बोलणारी स्त्री दुसरी तिसरी कोणी नाही तर पूजा असते. पूजा सलमानला भाईजान म्हणते यावर लगेच सलमान, ” भाई मी दुसऱ्यांसाठी आहे, तुझ्यासाठी तर फक्त जान आहे. आजपर्यंत मी फक्त तुझ्यामुळे लग्न केलेले नाही.” पूजाचा चेहरा दिसावा यासाठी सलमान तिला व्हिडिओ कॉल करतो मात्र तेवढ्यात लाइट जातात. त्यामुळे पूजाचा चेहरा काही नीट दिसत नाही. या मजेशीर टीझरमुळे प्रेक्षक खूपच खुश झाले असून, आता या पूजेसाठी खुद्द सलमानच वेडा झाल्याचे पाहून प्रेक्षक देखील तिचा चेहरा पाहण्यासाठी आतुर झाले आहे.

ड्रीम गर्ल 2 चा हा टिझर तुफान गाजत असून, सोशल मीडियावरही खूपच व्हायरल होत आहे. त्याच्यावर नेटकरी देखील भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान बालाजी टेलिफिल्म्सचा ‘ड्रीम गर्ल 2’ हा सिनेमा २०१९ साली आलेल्या ‘ड्रिमगर्ल’ चित्रपटाचा सिक्वल आहे. हा सिनेमा तुफान गाजला होता. आता पुन्हा पूजा ‘ड्रीम गर्ल 2’मधून सर्वांच्या भेटीला येणार आहे. लवकरच अर्थात ७ जुलै महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराणासोबतच अनन्या पांडे, अनु कपूर, परेश रावल, असरानी, मनजोत सिंह आणि विजय राज महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘माझा संघर्ष घरात प्रसिद्ध चेहरे असल्यामुळे…’ ‘या’ अभिनेत्रीने सांगितले तिच्या कठीण काळाबद्दल

प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ पोस्टवरून नेटकऱ्यांनी उडवली तिची खिल्ली विचारले, “हा कोणता खेळ आहे”

हे देखील वाचा