‘कॉलेजमधला सर्वात लोकप्रिय मुलगा, परंतु…’, जुना फोटो शेअर करत आयुष्मान खुरानाने स्वता: बद्दल सांगितलं गुपित


कलाकार अनेकदा सोशल मीडियावर त्याचे जुने फोटो पोस्ट करत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. कलाकारांच्या चाहत्यांना देखील त्यांच्या जुन्या आठवणी आणि सुरुवातीच्या काळाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडत असते. त्यामुळे जेव्हा जेव्हा कलाकार त्यांचे जुने फोटो किंवा आठवणी सोशल मीडियावर पोस्ट करतात, तेव्हा त्या नक्कीच चर्चेचा विषय बनतात.

हिंदी सिनेमातील आजच्या काळातला प्रतिभावान आणि दमदार अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयुष्मान खुरानाने नुकताच त्याच्या महाविद्यालयीन जीवनातला एक फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. तपकिरी रंगाचा शर्ट, गॉगल, चेहऱ्यावर एक मनमोहन हास्य असणाऱ्या या फोटोसोबत आयुष्मानने दिलेले कॅप्शन खूपच लक्षवेधी ठरत आहे. आयुष्मानने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ” गोष्ट आहे पंजाब विद्यापीठाच्या हट नंबर १४ ची, हास्य हे रोजच्या टेन्शन फ्री जीवनाचे रुटीन, मास कॉम विभागाच्या जुन्या इमारतीमागे..चहा आणि समोसा, विद्यापीठातील सर्वात लोकप्रिय मुलगा तरीही लाजाळू असणारा.”

आयुष्मानचा हा फोटो फॅन्समध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. सोबतच इंडस्ट्रीमधील अनेक लोकं त्याच्या या फोटोवर कमेंट्स करताना दिसत आहे. आयुष्मान सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. नुकताच साजरा झालेल्या फादर्स डे च्या दिवशी देखील त्यानं त्याच्या वडिलांना समर्पित अशी एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यात त्याने लिहिले होते की, “लहान असताना बाबांनी घालून दिलेले नियम मोडताना मजा येत असे. पण आता मोठं झाल्यानंतर स्वतःचे नियम मोडता येत नाहीत. ही शिस्त आम्हाला त्यांच्यामुळेच लागली. ते शिस्त, संगीत, कविता, चित्रपट आणि कलेचे प्रेमी होते. त्यांनी कायद्याचा अभ्यास केला, त्यांना जोतिष्यशास्त्र आवडत असे. त्यामुळेच माझ्या नावात दोन वेळा N आणि R ही अक्षरं येतात.”

बॉलिवूडमध्ये एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपट देणारा अभिनेता आयुष्मान खुराना सध्या यशाच्या शिखरावर आहे. ‘विक्की डोनर’ या सुपरहिट चित्रपटातून आयुष्मानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात त्याला अपयशही आले, मात्र यानंतर त्याने एकापेक्षा एक हिट चित्रपट केले.

आयुष्मान खुरानाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर लवकरच तो दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या ‘अनेक’ सिनेमात दिसत आहे. याशिवाय ‘चंडीगढ़ करे आशिकी’, ‘डॉक्टर जी’ चित्रपटातही आयुष्मान दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…नैणा ठग लेंगे’, म्हणत प्रार्थना बेहेरेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल

-नववारी साडीमध्ये खुललं अपूर्वा नेमळेकरचं सौंदर्य; तर कॅप्शननेही वेधलं अनेकांचं लक्ष

-स्पृहा जोशीचे लाजने पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका; व्हिडिओवर पडतोय लाईक्सचा पाऊस


Leave A Reply

Your email address will not be published.