Saturday, July 6, 2024

‘….अंदर के उजालो को जिंदा रखना”, म्हणत आयुष्यमान खुराणा झाला शायर

बॉलिवूडमध्ये मल्टीटॅलेंटेड कलाकार खूपच कमी पहायला मिळतात. कलाकार हे फक्त अभिनय किंवा ते ज्या क्षेत्राशी संबंधित आहे, त्याच कामात ते निपुण असतात. मात्र अभिनेता आयुष्मान खुराणा हा याला अपवाद आहे. बॉलिवूडचा हँडसम अभिनेता अर्थात आयुष्मान खुराणा हा बॉलिवूडमधील बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखला जातो. अभिनय, गायन, संगीत, लेखन, वादन आदी अनेक गोष्टींमध्ये तो सराईत आहे. आयुष्यमानने त्याच्या प्रभावी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकत बॉलिवूडमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

आज आयुष्यमान बॉलिवूडमधील यशस्वी आणि प्रभावी अभिनेता म्हणून ओळखला जातो. कमी बजेटच्या अतिशय सुंदर सिनेमांना नवीन आणि मोठी ओळख देण्यात त्याचा मोठा वाटा आहे. बजेटपेक्षा अभिनय आणि कथा जास्त महत्वाची हेच त्याने त्याच्या जवळपास प्रत्येक सिनेमातून सिद्ध केले आहे. मात्र या अष्टपैलू अभिनेत्याच्या व्यक्तिमत्वातील अजून एक मोठा गुण सर्वांसमोर आला आहे, आणि तो गुण म्हणजे त्याच्यात असणारा शायर. हो आयुष्यमान उत्तम शायर असल्याचे नुकतेच सर्वांना समजले आहे.

सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय असणारा आयुष्यमान खुराणा नेहमीच त्याचे फोटो शेअर करताना दिसतो. नुकताच त्याने त्याचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो कॅमेरासमोर उभा असल्याचे दिसत असून हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “खो जाएगी इन नकली टिमटिमाती बत्तियों की रोशनी कभी..अपने अंदर के उजालो को जिंदा रखना”.

सध्या आयुषमाची ही पोस्ट खूपच व्हायरल होत असून, फॅन्स देखील त्यावर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहे. या फोटो इतकेच त्याने दिलेले कॅप्शन देखील कमालीचे व्हायरल होत असून लोकांना आवडताना दिसत आहे. या कॅप्शनवर कमेंट्स करत लोकं हार्ट ईमोजी पोस्ट करत आहे. या सोबतच त्याच्यात असणाऱ्या शायरचे देखील तूफान कौतुक होत आहे.

आयुष्यमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर काही दिवसांपूर्वी त्याचा ‘अनेक’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात तो अपयशी ठरला. पण पठडीबाहेरील विषयावर आधारित असलेल्या या सिनेमाने समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांनी त्याच्या अभिनयाचे दखल खूप कौतुक केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा