Saturday, April 20, 2024

KK Death | केकेच्या मृत्यूचे खरे कारण येणार समोर, सीबीआय चौकशीसाठी याचिका दाखल

गायक केके (KK) यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर अवघी सिनेसृष्टीवर हादरली आहे. त्यांच्या मृत्यूचे वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. अशातच आता सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यास, कोलकत्ता उच्च न्यायालयाने वकील रविशंकर चॅटर्जी यांना परवानगी दिली आहे. कोलकाता येथे आयोजित एका कॉन्सर्टमध्ये लाइव्ह परफॉर्म केल्यानंतर केके यांचे निधन झाले होते.

 

कॉलेजवर लावला निष्काळजीपणाचा आरोप
वृत्तानुसार, गायक केके यांच्या मृत्यूचा पुढील तपास करण्यासाठी स्वतंत्र एजन्सीची मागणी करणारी दुसरी जनहित याचिकाही कोलकाता उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या शेवटच्या कॉन्सर्टमध्ये गैरव्यवस्थापन झाल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. याचिकाकर्त्याने केकेचा शेवटचा कॉन्सर्ट ज्या कॉलेजमध्ये झाला, त्या कॉलेजच्या निष्काळजीपणाचाही उल्लेख केला आहे. (singer kk death lawyer ravishankar chatterjee to file a pil demanding cbi enquiry)

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ‘हे’ झाले उघड
शनिवारी (४ जून) गायक-गीतकार कृष्णकुमार कुननाथ यांचा अंतिम पोस्टमॉर्टम आणि रासायनिक विश्लेषण अहवाल समोर आला होता. दोन्ही अहवालांमध्ये मृत्यूचे कारण ‘मायोकार्डियल इन्फेक्शन’ असे नमूद करण्यात आले आहे.

३१ मे च्या रात्री काय घडले?
३१ मे रोजी कॉन्सर्टनंतर काही तासांनीच केके यांचे निधन झाले. या संगीत कार्यक्रमानंतर गायकाला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे कार्यक्रमानंतर त्यांना हॉटेलच्या खोलीत नेण्यात आले, तिथे ते चक्कर येऊन पडले. काही वेळातच गायकाला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

अलविदा केके….
केके यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनीही केकेच्या आठवणीत पोस्ट शेअर केली आहे. अक्षय कुमार, विशाल ददलानी, करण जोहर, अर्शद वारसी, अनुष्का शर्मा आणि इतर सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा