बॉलिवूडमध्ये शुटींगदरम्यान अशा काही गोष्टी घडतात जे प्रेक्षकांना सांगण्यासारख्या नसतात पण, अशा काही कारणामुळे त्यांचे घर देखील उध्वस्त होण्यापासून वाचले आहे. हिंदी चित्रपटामध्ये अभिनेता असो किंवा अभिनेत्री असो किसिंग सीन आणि बोल्ड सीन करत असताना हे तेवढ्याच चर्चेत असते जेवढे आधी असायचे. भले ओटीटी असे कटेंट भरमसाठ आहेत, बोल्ड सीन आणि किसिंग सीन यावर खूपसाऱ्या वेबसिरीज मिळून जातील. बॉलिवूडमध्ये आजही अशाप्रकारचे सीन करण्यासाठी काही कलाकार आपला नकार देतात आणि असे काहि कलाकार आहेत की, जे विवाहीत असूनही किसिंग सिन केल्यामुळे त्यांच्यावर रडण्याची वेळ अली होती. काही अभिनेत्यांचे तर घर तुटता तुटता वाचले आहे. चला तर जाणून घेउया की, कोणते आहेत ते कलाकार
आयुष्मान खुराना
जेव्हा आयुष्मान खुरानाचा ( Aushmann Khurrana ) ‘विकी डोनर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा त्या चित्रपटामध्ये एक किसिंग सीन होता. स्वत: अभिनेताने या गोष्टीचा खुलासा केला आहे की, त्याची बायको हा चित्रपट त्याचा हात पकडून बघत होती जेव्हा, हा सीन आला तिने लगेच माझा हात रागाने सोडला. आणखी एकदा कोणत्यातरी चित्रपटामध्ये किसिंग सीन होता, पहिले तर त्याच्या पत्नी ताहिराने( Tahira Kashyap ) दिग्दर्शकाला सांगितले की, त्याला हा सीन करण्यासाठी काहीच हरकत नाही. पण किसिंग सीन संपल्यानंतर ती रागाने निघून गेली होती. आता कधी चित्रपटामध्ये किसिंग सीन असेल तर आयुष्मान अशा सीनसाठी नकार देतो.
अजय देवगन
अजय देवगन ( Ajay Devgan ) याने ‘शिवाय’ या चित्रपटामध्ये एका अभिनेत्रीसोबत पहिल्यांदा पडद्यावर किसिंग सीन केला होता. जेव्हा काजोलला या सीनबद्दल कळाले होते, तेव्हा ती खूपच रागवली होती. अजयने कपिल शर्मा या कार्यक्रमात सांगितले होते की, “मला त्यावेळेस ‘दिलवाले’ या चित्रपटाची आठवण आली होती.” काजोल ( Kajol ) एवढी चिडली होती की, तीला वाटत होते की अजयला गोळी मारावी कारण अजय देवगनने या सीनबद्दल काजोलपासून लपवले होते. याच्यामुळे अजयला काजोलशी हात जोडून माफी देखील मागावी लागली होती.
अक्षय कुमार
बॉलिवूडचे खिलाडी म्हणून ओळखला जाणारे अक्षय कुमार ( Akshay Kumar ) यालाही किसिंग सीन पडला होता महागात. अक्षयने शिल्पा शेट्टी ( Shilpa Shetty ) सोबत धडकन हा चित्रपट केला होता तेव्हा, ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna )सोबत अक्षयचा साखरपुडा झाला होता. जेव्हा ट्विंकलला कळाले की, धडकन या चित्रपटामध्ये अक्षय आणि शिल्पा शेट्टीचा किसिंग सीन आहे तेव्हा ट्विंकल खूप रागवली होती आणि दोघांमध्ये खूप भांडणही पेटले होते. तेव्हापासून अक्षय कुमार किसिंग सीन असेल तर कानाला हात पकडतो.
शाहरुख खान
शाहरुख खान ( Shahrukh Khan ) जरी बॉलिवूडचा किंग खान असला तरी घरची किंग ही गौरी खान ( Gauri Khan ) हीचं आहे. असं वाटते की शाहरुख त्याच्या पत्नीला खूपच घाबरत आहे, त्याच्यामुळे त्याने आपल्या करारामध्ये ‘नो किसिंग’ पॉलिसी असे लिहून घेतले होते. पण तरीही त्याने चूक केलीच शाहरुखने दिग्गज दिग्दर्शक यश चोपडा यांच्या ‘जब तक हैं जान’ या चित्रपटामध्ये कॅटरीनासोबत पहिल्यांदा किसिंग सीन केला होता. यानंतर त्याने सांगितले होते की मी सगळ्यांसमोर रोमॅंटिक सीन करताना मला लाजल्यासारखे वाटते, त्यामुळे मी गौरी समोर असे सीन करणे टाळत असतो.
हेही वाचा-
बाबो! तापसी पन्नूसमोरचं अनुराग कश्यपचे धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, ‘माझे स्तन तिच्यापेक्षा…’
अनुराग कश्यपने करण जोहरबाबत केला मोठा खुलासा; म्हणाला, ‘तो कलाकारांना…’
‘तुम्हाला मी जास्त आवडते की ऐश्वर्या’? स्पर्धकाच्या ‘त्या’ प्रश्नाने लाजून लाल झाले अमिताभ बच्चन