Sunday, April 14, 2024

अनुराग कश्यपने करण जोहरबाबत केला मोठा खुलासा; म्हणाला, ‘तो कलाकारांना…’

बॉलिवूड निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) सध्या त्याच्या ‘दोबारा’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून अभिनेत्री तापसी पन्नूची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या आगामी चित्रपटासोबतच अनुराग कश्यप त्याच्या वक्तव्यांमुळेही चांगलेच चर्चेत आले आहेत. नुकतेच त्यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये चाललेल्या वादावर नुकतेच वक्तव्य केले आहे. काय आहे हे नेमके प्रकरण चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, ‘दोबारा’ हा चित्रपट 19 ऑगस्टपासून चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला  येणार आहे. अनुरागच्या थ्रिलर चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. सध्या चित्रपट निर्माते आपल्या वक्तव्यामुळे खूप चर्चेत आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्री विरुद्ध बॉलीवूड याविषयी सुरू असलेल्या वादावरही त्यांनी मत व्यक्त केले. याशिवाय विवेक अग्निहोत्रीच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे खूप चर्चेत होता. आता अलिकडेच त्याने  करण जोहरबद्दल  वक्तव्य केले आहे. करण जोहर हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक आहे. इंडस्ट्रीत त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात.

एका मुलाखतीत करण जोहरबद्दल बोलताना अनुराग कश्यप म्हणाला की, “माय नेम इज खान’च्या दिग्दर्शकाच्या वडिलांना मी ओळखतो. तो चित्रपट जगतातील पार्श्वभूमीतून आला आहे, त्याला खूप दिलासा मिळाला आहे आणि मी त्याला खूप न्याय दिला आहे. मात्र, आम्ही भेटलो तेव्हा तोही आमच्यासारखाच वाटायचा. त्याचबरोबर अनुराग कश्यपने करण जोहरचे तोंडभरुन कौतुक केले.

करण जोहरबद्दल बोलताना अनुराग कश्यप म्हणाला की, “करण त्याच्या निर्मात्यांना तसेच कलाकारांना खुप स्वातंत्र्य देतो. तसेच तो एक धाडसी आणि प्रयोगशील दिग्दर्शक आहे. त्याला स्वतःच्या चुका मान्य करायला येतात, त्यामुळेच तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. असे मत त्याने व्यक्त केले आहे.

हेही वाचा –

बॉलिवूडमधील ‘या’ सुपरहिट चित्रपटांना नाकारून करीना कपूरने केली मोठी चूक, आज होतोय पश्चाताप

‘मी सर्वांना विनंती करते…’ राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीची भावुक प्रतिक्रिया समोर

‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या चित्रपटात सान्या मल्होत्राला मिळाली संधी, सोबत असणार हँडसम हिरो

हे देखील वाचा