हे वर्ष संपायला काहीच दिवस शिल्लक आले तरी वाईट बातम्या काही थांबायचे नाव घेत नाही. ह्यावर्षी अनेक हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या निधनाच्या बातम्या आल्या सोबतच अनेक प्रादेशिक भाषांतील कलाकारांनी देखील या जगाचा निरोप घेतला. २०२० हे वर्ष संपत आले असले तरी वाईट बातम्या संपत नाहीये.
नुकतेच साऊथ सिनेमांमधील प्रसिद्ध अभिनेते अनिल नेडुमंगड यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी पाण्यात बुडून निधन झाले. प्राप्त माहितीनुसार अनिल नेडुमंगड हे केरळच्या मलंकारा धरणात आंघोळीला गेले असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला.
अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांनी ट्वीट करत अनिल नेदुमंगड यांच्या निधनाबद्दल माहिती दिली. त्यांनी त्यांच्या ट्विट मध्ये ‘काहीच नाही माझ्याकडे शब्दच नाहीत काही बोलायला. अपेक्षा करतो की तुझ्या आत्म्याला शांती लाभली असेल’, असे म्हटले आहे.
अनिल नेदुमंगड हे थोडुपुझा येथे जोजू जॉर्ड यांच्या ‘पीस’ या चित्रपटाचे शूटिंग करत होते. शूटिंग दरम्यान सिनेमातील अभिनेते आणि क्रू मेंबर्सला ब्रेक मिळाला. त्यामुळे अनिल आणि मित्र पोहायला गेले. बाकीचे लोक किनाऱ्यावर थांबले होते, पण पोहता पोहता अनिल खोल पाण्यात गेले आणि पाण्याच्या प्रवाहामुळे ते बुडाले.
थोडा वेळ झाला तरी अनिल पाण्यात दिसत नसल्याने तिथल्या त्यांच्या मित्रांनी त्यांना शोधण्यास सुरुवात केली. बराच वेळ शोधाशोध झाल्यानंतर त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांना लगेच रुग्णालयात नेले गेले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तिथे पोह्चलीवर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अनिल नेदुमंगड यांनी त्यांच्या करियरची सुरुवात सूत्रसंचालच्या रूपात केली. २०१४ त्यांनी चित्रपटांच्या क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांनी अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय भूमिका निभावल्या. त्यांनी ‘अय्यप्पनम कोशियुम, कम्मतिपादम, पावड़ा, किस्मत,पैरोल, नेजन स्टीव लोपेज’ आणि ‘पोरिंजू मरियम जोस’ यांसारख्या चित्रपटात काम केले.